मुंबई ते शिर्डि माझी पहिली नाइटराईड


एका दिवसात.. HERO HONDA Passion pro १०० cc bike सोबत.

दिनांक १८/०२/२०१७

      

           मुंबई ते शिर्डि हां माझा रात्रीचा आणी एवढा दुरचा प्रवास करन्याचा आमचा पहिला अनुभव होता. एकदातरीं मुंबई ते शिर्डि  मोटरसायकल वरुन प्रवास करणयाची अगदी लहानपणा पासुनची ईछा होती. मी अनेक मित्रांशी ति बोलुन दाखवली होती. सर्वजण म्हणाले. की नक्की जाऊ. पण राईडच्या आधी सर्वानी नकार दिला. केवळ एक मित्र सोबत येन्यास तयार झाला.

प्रवासाचा आरखड़ा 

ख़ालिल प्रमाणे आख़ून घेतला.

Google map वर सेट केला.

मुंबई (जोगेश्वरी) ते शिर्डि वाया घोटी..

मुंबई ते शिर्डि जावयासाठी दोन रस्ते आहेत.

१) घोटी मार्गे सिन्नर – शिर्डि २३८ किलोमीटर,

२) नाशिक मार्गे – शिर्डि = २७२ किलोमीटर,

दोघा पैकी रात्रीच्या राइड – प्रवासाठी नाशिक मार्गे जाणे जास्ती सोईसकर आणी सावधगिरिचे ठरेल.

सकाळी प्रवास करायचा असेल तर घोटी मार्गे जाणे वेळ वाचवू शकते.

रस्त्यात येथे थांबा..

१) भिवंडी बाईपास टोलनाका. ५० km.

२) क़सारा १०० km./५० km

नयन रम्य कसारा घाट…

३) इगतपूरी १२५ km. /२५ Km

/ घोटी टोल प्लाझा १२८ Km./३ Km

४) नाशिक १६६ km./३४ Km

५) सिन्नर = १८३ km/१७ Km

६) शिर्डि = २४० Km

प्रवास वर्णन…

आम्ही मध्यमवर्गीय कूटुंबियातिल असल्यामूळे ऑफ़ीस वरुन सूटल्यानंतर राईडला जान्याचा बेत आखला. निघायला उशिर होउ नये म्हणून सोबत भाकरी आणी वांग्याचे भारित घेतले. ठरलेल्या जागी आम्ही भेटलो oआणी गणपति बाप्पा मोराया जयघोष करुन राईडला

Advertisements

सूरवात केली. पेट्रोल पंपावर जाउन पेट्रोल ची टाकी फ़ुल करुन घेतली. 

आमच्या कड़े हापफेस हेल्मेट,स्वेटर आणी लोकरिचे(woolen) हँडग्लोवझ या व्यातिरिकत प्रचंड इछाशक्ति आणी दर्शनाची ओढ. ट्राफ़िक मधुन मागे पुढे

करत आम्ही आमचा पहिला थाम्बा (मीटिंग पोईंट) गाठला तब्बल ५० km, पूर्ण झाले होते. 

भिवंडी माधिल ट्राफ़िक आणी प्रदूषण या मुळे चेहरा थोड़ा कालवनडला, यावेळी फूलफेस हेल्मेट ची कमी भासुन  गेली. अगदी १० मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो.

मुंबईतिल ट्राफ़ीक आता विरल झाले आणी मुंबई आगरा हायवे सूरु झाला. मोकळया रोड मूळे मोटरसायकल चालवान्याचा आनंद द्विगुणित झाला.

म्हणता म्हणता आम्ही कधी कसारा गाठला हे कळलच नाही. कसारा येथे आम्ही एका होटेलच्या पर्किंग मध्ये बाइक पार्क केल्या, घरातुन आणलेली भाकरी आणी भरित यावर ताव मारला. रात्रीचे ११:३० वाजले होते. 

अजुन काही थकवा अथवा झोप आली न्हवती त्यामूळे

पुढ़ील वाटचाल सूरु केली. आता येणार होता आमचा आवडता ‘ कसारा घाट’ नागमोड़ी वळणाची जणू मेज़वानी समोर आली होती. एक एक वळण अगदी अपसरेच्या गळयातील मोतीहार भासत होते. 

कोरनेरिंग ची खरी मज़ा आम्ही लूटत होतों. 

तब्बल २० km घाट कधी संपला ते कळलच नाही. 

घाट हां एकमार्गी आहे. (Oneway).

घाट चढ़ल्या नंतर आपण इगतपुरी ला पोहचतो.

इगतपुरी हे ही एक ठंड हवेचे ठीकाण आहेतिथुन ३ किलोमीटर अंतरावर घोटी टोल नाका आहे. तेथे आम्ही चाय पिण्यासाठी थांबलो. आता थोड़ी ठंडी वाढली होती.

जवळपास पन्नास टक्के अंतर पार क़ेले होते. 

पण अजुन थोड़े अंतर पार करण्याचे ठरवले आणी पुढे निघालो. 

जसे घोटी फाटा क्रोस केला आणी टोटल ऑफ रोडीग सूरु झाले. रस्त्यात खड्डे की खड़्यातुन रस्ते काही कळेना. वर ख़ाली कधी आजु बाजु करत खड़्यामधुन वाट काढ़त पुढे निघालो आणी सिन्नर गाठले.

आता फक्त ५६ किलोमीटर बाक़ी राहिले होते.

 पण डोळयावर झोप येत होती. जवळच एका मंदीराच्या  आवरात आम्ही थोड़ी झोप घ्यायचे ठरवले. मंदिराच्या बाहेरबाईक पार्क केली. रात्रीचे १:४५ झाले होते. तासभर आराम करुन आम्ही पुनः बाईक वर स्वार झालो. जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर चहा प्यायलो आणी रीफ्रेश झालो.

आता शिर्डि केवळ ४0 किलोमीटर बाक़ी होते.

ठंडी कमालीचि वाढली, पुढे बाईक चालवताना अगदी ४० च्या स्पीडने चालवावी लागली. तासाभरात आम्ही शिर्डिच्या चेकपोस्ट जवळ पोहाचलो. आमच्या आनंदाला पारावार रहिला नाही. एक स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मनात संतुष्टिचा भाव दोन्ही एकत्र रेंगाळूण गेला. शिर्डि पोहचताच अनेक जण आम्हाला रूम पहिजे का विचारु लागले. आम्हास फ़क्त आघोळ आणी थोडा आराम करण्यासाठी रूम हवी होती. त्यामूळे अवघ्या ३०० रुपयात आम्हाला रूम मीळाला. सकाळचे ४:३० झाले होते त्यामूले आम्ही पहिले दर्शन घेउन नंतर आराम करायचे ठरवले. अशी झाली आमचि पहिली बाईक राईड. पुढे आम्ही आंघोळ करून दर्शनाचा  पास घेतला आणी साईबाबाच्या चरणी लीन झालो. 

श्री साईबाबा समाधि मंदिर. शिर्डि, 

जिल्हाअहमदनगर.महाराष्ट्र.

या सोबत आपण ख़ालिल ठीकाणे पाहु शकता…

वणी, नाशिक, शनीशिगणापुर, साक़ेरी, सोनाई आणी त्रिंबकेश्वर…

Categories: HOLY PLACES, TOURS & BIKE RIDES

1 comment

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: