Jyotirling Trimbakeshwar


SHREE SWAMI SAMARTH ALL INDIA GURU PEETH

The Trimbakeshwar Shiva Temple is located near Nashiq Maharashtra.

One of the twelve Jyotirlinga. Nearest Airport MUMBAI 178 km. Nearest city Nashik 30 Km.

Advertisements

१) त्रिंबकेशवर :-
त्रिंबकेशवर हे एक ज्योतिरलिंग आहे. हे भारतातिल १२ ज्योतिरलिंगापैकी एक आहे. येथे दर बारा वर्षाने एकदा कुंभमेंळा भरतो, गोदावरी नदीचे उगमस्थान एथेच आहे.ब्रमहागिरी = डोंगर माथ्यावर १२०० पायरया आणी थोडया दुर्गम वाटा पार करुन आपण ब्रमहागिरी येथेचालत पोहचु शकतो.

२) स्वामी समर्थ गुरुपीठ त्रिंबकेश्वर. 

स्वामीभक्तानी निर्माण केलेले दिंडोरि प्रणित अखिलभारतीय गुरूपीठ आहे. येथे साडेतीन शक्तिपीठाची प्रतिकृति तयार करण्यात आली आहे. संस्थेने अगदी जनकल्याणासाठी आध्यात्मिक वर्ग सूरु केले आहेत. येथे मोफत अन्नदान ही केले जाते.अगदी मनमोहक वास्तुरचना आणी तिटकिच सुंदर देखरेख याची उत्तम सांगड एथे दिसुन येते.त्रिंबकेशवर पासुन अवघ्या ३ किलोमिटर आधी गुरूपीठ आहे. त्यामूले आवर्जुन भेट दया.
प्रवास वर्णनअहमदनगर, नाशिक हे ज़िल्हे रात्री जेवढे ठंड असतात. तेवढेच दुपारी निखारे भासतात. उन्हात बाइक चालवताना खूप तहान लागत होती. सतत काही ठंड प्यावेसे वाटत होते. अशातच आम्ही नाशिक ला पोहाचलो आणी गूगल mapने अक्षरशः गोल ग़ोल फ़िरवले शेवटी स्थानिक लोकनच्या मदातिने आम्ही गोदावरीतट आणी पंचवटी करत नाशिक बाहेर पोहाचलो.                तब्बल १/२ तास रस्ता शोधत आणी लोकल ट्राफ़िक मधे कामी आला. आता तहान अधिक वाढली, जवळच एक उसाचारस विक्रि केंद्र दिसले. आम्ही तेथे थाम्बलो. विशेष म्हणजेउसाचा रस काढ़णया साठी चक्क बैल वापरला जात होता. घाणा पधातिने बैलाला गोल फिरवुन हां रस अगदी स्वछ आणी ताज़ा काढ़ूँन दिला जात होता. आम्ही अगदी दोन मोठे ग्लास भरुन, त्यात चाट मसाला, काळे मीठ टाकुन लगेच ओठाआड केले.                   पुढे आम्ही गुरूपीठ त्रिंबकेश्वर येथे दर्शन घेतले. मनमोहक वास्तु कलेचे दर्शन तेवढेच स्वछ प्रांगण. मधोमध स्थापन केलेलि श्री स्वामी समर्थ महाराजाची देह भान हरपुन टाकणारी मूर्ति पाहुन मन अगदी प्रसन्न झाले. आतिल बाजुस असलेली साडेतीनशक्तिपीठ, कालभैरव आणी पंचमुखी मारुति यांचे हिदर्शन घेतले. 

  • Google Map वापरतना, औफ लाईन म्यॅप डाउनलोड करा.
  • अनोळखी शहरातून फिरताना औटो ट्राफ़िक मोड बंद करा.
  • प्रत्येक अनॊळखी तीन कीव्हा अधिक रस्ते असल्यास थोड़े थाम्बुन योग्य रस्ता निवडा.

प्रवासाचा आराखड़ा
१) शिर्डि ते त्रिंबकेशवर १२३ किलोमीटर२) मुंबई ते त्रिंबकेशवर १७० किलोमीटर.

Categories: HOLY PLACES
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: