Shree Swamidatta Adhisthan Lonavala Travel Guide


Shree Swamidatta Adhisthan holy place located in nagargaon near Lonavala, Pune, Maharashtra, India. This blog will help you about information about Shree Swamidatt Sevadham, Swamidatt Adhishtan, Satya Dattapooja, how to reach, things to do, tips It will help you as travel guide.

श्री स्वामीदत्त सेवाधाम लोणावळा

Where there is Swami, there is Annapurna, food is Purnabrahma = God. Food donation is the best donation. The place where all these sentences come true is Sri Swamidatta Sevadham Lonavla.

जेथे स्वामी तेथे अन्नपूर्णा, अन्न हे पूर्णब्रह्म. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान. ही सर्व वाक्ये ज्याठिकाणी खरी ठरतात ते ठिकाण म्हणजेच श्री स्वामीदत्त सेवाधाम लोणावळा.

The activists and members are so friendly that you will not feel like you are meeting for the first time after coming here. From time to time, people here add a different kind of affection.

येथील कार्यकर्ते आणि सभासद एवढे मनमिळाऊ आहे की तुम्हाला येथे आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच भेटत आहात असं वाटणारच नाही. एका वेगळ्या आपुलकीच्या नात्याने येथील माणसे वेळोवेळी  आदरातिथ्य करत असतात. अतिथी देवो भव हे वाक्य पूर्णपणे सार्थक करतात.

Swamidatta Adhishtan lonavala – स्वामीदत्त अधिष्ठान लोणावळा

Swamidatta Adhisthan Lonavla is the temple of Shri Swami Samarth Maharaj. This is a very important place spiritually.
The day begins with the morning abhishek and then various rituals like Aarti Naivedya are performed. Adding to this is a meditation room. In which devotees can meditate even in a quiet environment.

स्वामीदत्त अधिष्ठान लोणावळा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे. हे अध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे.
सकाळच्या अभिषेका पासून दिवसाची सुरुवात होते आणि पुढे आरती नैवेद्य अशा विविध विधी केल्या जातात. यालाच जोडून एक ध्यानसाधना कक्ष आहे. ज्यामध्ये भाविक अगदी शांत वातावरणामध्ये ध्यानधारणा करू शकतात.

Various types of spiritual lectures are organized at Swamidatta Adhisthan Lonavla for the spiritual development of the devotees. In which different pooja rituals or principles work in a scientific way. Many types of bhajans are performed there. The right combination of spirituality and social enlightenment has been put here.

भाविकांच्या शास्त्रोक्‍त अध्यात्मिक विकास होण्यासाठी स्वामीदत्त अधिष्ठान लोणावळा येथे अनेक प्रकारच्या अध्यात्मिक व्याख्यानांचे आयोजन केले जाते. ज्या मध्ये वेगळ्या पूजा विधी किंवा तत्वे कशा प्रकारे काम करतात हे शास्त्रोक्त पद्धतीने समजावले जाते. अनेक प्रकारचे भजने कीर्तने तेथे केली जातात. अध्यात्म आणि समाज प्रबोधन यांची योग्य सांगड येथे घातली गेलेली आहे.

Satya Dattapooja – सत्य दत्तपूजा

Satyadatta – You will know by listening to Satyanarayana’s worship. In this Satyanarayana is mainly worshiped. Satyadatta Pooja is for Datta Sampradaya. So here’s Shri’s Paduka or The idol is worshiped. Like Satyanarayana Pooja, Satyadatta Pooja is also taken from Sahasranamavali of Shridatta. Hence this pooja is called Satyadatta.

satyadatta – तुम्हाला सत्यनारायणाची पूजा माहित असेल. यामध्ये प्रामुख्याने सत्यनारायणाची पूजा केली जाते. सत्यदत्त पूजा ही दत्त संप्रदायाची आहे. म्हणून इथे श्रींच्या पादुका किंवा मूर्तीची पूजा केली जाते. सत्यनारायण पूजेप्रमाणेच सत्यदत्त पूजेमध्ये श्रीदत्ताच्या सहस्रनामावली चे पठण केले जाते. म्हणून या पूजेला सत्यदत्त म्हणतात.

Advertisements

The third Sunday of each month At Swami Dutt Seva Dham Satya Datta is a collective worship ritual In general 25 couples can participate. You do not need any personal preparation. The Member of the monastery prepare their puja in advance. Chowrang as well as other worship rituals are completely Is provided free of charge. The cost of all this is a lot but for The cost of this pooja ritual has been kept at only five hundred rupees so that the common man can perform this pooja.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी स्वामी दत्त सेवा धाम येथे सत्य दत्त हा सामूहिक उपासना विधी आहे सर्वसाधारणपणे २५ जोडपी सहभागी होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही वैयक्तिक तयारीची गरज नाही. मठाचे सदस्य त्यांच्या पूजेची आगाऊ तयारी करतात. चौरंग तसेच इतर पूजा विधी पूर्णपणे मोफत दिले जातात. या सर्वाचा खर्च खूप आहे पण सर्वसामान्यांना ही पूजा करता यावी म्हणून या पूजाविधीचा खर्च फक्त पाचशे रुपये ठेवण्यात आला आहे.

Annadan – अन्नदान – अन्नछत्र

The food donation service is uninterrupted here. Three times a day is breakfast in the morning and lunch in the afternoon and dinner in night Without charge. This facility available for all Upcoming devotees as well as poor person. In this way food is donated throughout the year.  Expenses incurred for this and member workers from their own income and It is also done through donations coming to the monastery.

येथे अन्नदानाची सेवा अविरत चालू आहे. दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी नाश्ता आणि दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण विनाशुल्क. येणाऱ्या भाविकांसाठी तसेच गरीब व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. अशा प्रकारे वर्षभर अन्नदान केले जाते. यासाठी होणारा खर्च आणि सभासद कामगार स्वतःच्या उत्पन्नातून आणि तो मठात येणाऱ्या देणग्यांमधूनही केला जातो.

Members and their dedication – सदस्य आणि त्यांचे समर्पण

This organization is based on the dedication of the members. I have talked many times about the history of this organization, when I discussed various topics with the old members, it was noticed that many efforts have been made to set up this organization. Some members have even donated their entire life income here. Some of them have made this organization big through their hard work and some of their thoughts.

ही संस्था उभी राहिली आहे तेथील सभासदांच्या समर्पण भावनेतून. या संस्थेच्या इतिहासाबद्दल मी अनेकवेळा बोललो आहे, जेव्हा मी जुन्या सदस्यांशी विविध विषयांवर चर्चा केली त्यावेळी हे लक्षात आलं की ही संस्था उभारण्यासाठी अनेक प्रकारचे काबाडकष्ट केलेले आहे. काही सभासदांनी तर आपल्या आयुष्यातलं पुर्ण मिळकत येथे दान केली आहे. काही जणांनी आपल्या श्रमदानातून काही आपल्या विचारातून या संस्थेला मोठे केले आहे.

The members who come here forget themselves and work. No matter what position he is working in his personal life, he works as Swami Das after coming here. Their main job is to entertain everyone who comes. They do all kinds of work like cooking, growing, cleaning, seeing what the devotees want. That is why this organization was named as Sevadham.

येथे येणारे सभासद हे स्वतःलाच विसरून काम करतात. वैयक्तिक आयुष्यामध्ये कुठल्याही पदावर काम करत असतील तरी ते इथे आल्यानंतर स्वामी दास म्हणून काम करतात. येणाऱ्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम असतं. जेवण बनवून वाढणे, साफसफाई करणं, येणाऱ्या भाविकांना काही हवं ते पाहणे अशा वेगवेगळ्या ची कामं ते करत असतात. किंबहुना म्हणूनच या संस्थेला सेवाधाम असे नाव दिले.

Tips and Things to do – टिपा आणि करण्यासारख्या गोष्टी

  • आपण यथाशक्ती येथे अन्नदान कार्यामध्ये भाग घेऊ शकता
    • तुम्ही इथे आल्यानंतर येथे जेवण वाढण्याचा किंवा इतर कामात मदत करून सेवेकरी बनू शकता
    • येथील एका योजनेनुसार तुम्ही एकदाच ठराविक रक्कम भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या तारखेला, तुम्ही दिलेल्या व्यक्तीच्या नावे, वर्षातून एकदा अन्नदान केले जाते. हा उपक्रम वर्षानुवर्षे तसाच चालू राहतो.
    • एकाच योजनेमार्फत गरजवंत विद्यार्थ्यांना तिथून शैक्षणिक कार्यासाठी मदत केली जाते.
  • सत्यदत्त पूजा – यासाठी साधारणपणे 15 दिवस ते एक महिना अगोदर बुकिंग करावे लागते. बैठकीचे मर्यादा 25 जोडपी एवढी आहे. प्रत्येक जोडप्या मागे फक्त पाचशे रुपये शुल्क आकारले जाते. जर तुम्हाला पूजेसाठी एकटे बसायचे असेल तर ते देखील शक्य आहे.
  • अभिषेक पूजा – सकाळी साडेसहाच्या दरम्यान अभिषेक केला जातो त्यामुळे आपण इच्छुक असाल तर अभिषेक पूजेमध्ये भाग घेऊ शकता.
  • ध्यान साधना – तुम्ही इच्छुक असाल तर येथे ध्यानधारणा करू शकता.

|| श्रीस्वामी माला मंत्र ||

How to Reach Shree Swamidatt Sevadham Lonavala

Places to Visit

Things to do

Categories: HOLY PLACES, UNKNOWN PLACESTags: , ,
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: