Ekvira Devi Temple Travel Guide and tips एकवीरा देवी मंदिर


Ekvira Devi Temple is located on Carla Hill, 11 km from Lonavla, District Pune, State of Maharashtra. Fishermen from Maharashtra consider him as their village deity. Carla is famous for its Buddha Caves. In this post we share our personal experiences, sights nearby, how to reach, some images, map links that will help you as a travel guide when planning a trip.

एकवीरा देवी मंदिर हे कार्ला डोंगरावर स्थापित आहे, हे ठिकाण लोणावळ्यापासून सात किलोमीटर अंतरावर आहे, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रातील मच्छीमार बांधव त्यांना त्यांचे ग्रामदैवत मानतात. कार्ला हे ठिकाण बुद्ध लेण्यांसाठी ही प्रसिद्ध आहे. या पोस्टमध्ये आम्ही आमचे वैयक्तिक अनुभव, जवळील प्रेक्षणीय स्थळे, कसे पोहोचायचे, काही प्रतिमा, नकाशा लिंक्स जे तुम्हाला प्रवासाचे नियोजन करताना प्रवास मार्गदर्शक म्हणून मदत करतील.

Personal Experience

आम्ही दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही एकवीरा देवीच्या दर्शनाने करतो. जणुकाही एक तारीख आणि एक वीरा हे जणुकाही गणितचा मी मानले आहे. दरवर्षी न चुकता आम्ही एकविरा देवीच्या दर्शनाला जातो. एकवीरा आली तू डोंगरावरी, नजर आली तुझ्या कोळ्यावरी. हे कोळी गीत महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. अशा आपल्या कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेली एकवीरा माता ही डोंगरमाथ्यावर स्थित आहे. आणि तिथून ते समुद्रात मध्ये गेलेले आपले कोळी बांधव यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.

Ekvira Mata Temple and Legend – एकविरा माता मंदिर आणि आख्यायिका

Ekvira Ai is the symbol of mother Renuka. One of them is the temple of Ekvira Ai which belongs to the Pandava period and is believed to have been built by the Pandavas in one night. Kalbhairav is the brother of Ekvira Mata and he comes to visit Chaitra Shuddha Saptami Devi. On the same day, a big festival is celebrated in and around Ekvira Temple. Ekvira is the name of a Vira’s mother, whose name is Mahavira.

एकविरा आई हे रेणुका मातेची प्रतीक आहे, माता शक्तीचे हे गडावर चे वास्तव्य कथित करताना भाविक अनेक आख्यायिका सांगतात. त्यापैकीच एक म्हणजे एकवीरा आईचे मंदिर हे पांडवकालीन असून पांडवांनी ते एका रात्रीत घडवले असे मानले जाते. कालभैरव हे एकवीरा मातेचे बंधुराज असून ते चैत्र शुध्द सप्तमीला देवीच्या भेटीसाठी येतात. याच दिवशी एकविरा आई मंदिरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. एकविरा हे नाव एका विराची आई, ज्यांचे नाव महावीर आहे.

The way to the temple – मंदिराकडे जाण्याचा मार्ग

There are two ways to reach the temple from the foot of the hill. One of them is to go up the hill completely. You have to climb five hundred and six hundred steps. The second route is a bit easier and vehicles can go up to half way. However, this road is very steep and short and vehicles have to drive very carefully. Another temple, Ekvira Ase, has been set up at the foot of the hill. Devotees who are unable to climb the mountain, as well as those who have vows, fulfill their vows by visiting this temple.

डोंगराच्या पायथ्या कडून मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक जेथून संपूर्णपणे पायर्‍या चढून डोंगरावर जावे लागते. तब्बल पाचशे सहाशे पायऱ्या तुम्हाला चढून जावे लागतात. दुसरा मार्ग थोडा सुकर असून अर्ध्या रस्त्यात पर्यंत वाहने जाऊ शकतात. मात्र हा रोड फारच निमुळता आणि लहान असून वाहने अगदी सावधगिरीने चालवावी लागतात. डोंगराच्या पायथ्याशी एकविरा एसे अजून एक मंदिर स्थापित केली आहे. ज्या भक्तांना डोंगर वाट चढून जाणे शक्य नाही तसेच नवस असलेले व्यक्ती हे आपले नवस या मंदिराचे दर्शन घेऊन पूर्ण करतात.

After climbing the hill, you come across the temple of Ekvira Ai and Carla Caves. The temple management has arranged a darshan queue for the huge crowd of devotees to pay obeisance to the Goddess. It takes about two to three hours to visit the main queue on Sundays and other holidays. Devotees who have time constraints are provided this facility of Mukhdarshan. The darshan was in ten to fifteen minutes.

डोंगर चढून गेल्यानंतर, आपल्याला एकवीरा आईचे मंदिर आणि कार्ला लेणी दृष्टिक्षेपात पडतात. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अमाप गर्दी असते त्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी मुख्य रांगेत दर्शन घेण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास एवढा वेळ लागतो. ज्या भाविकांना वेळेचे बंधन असल्यास त्यांना मुखदर्शनाची ही सोय करण्यात आली आहे. जे दर्शन दहा ते पंधरा मिनिटात होते.

Advertisements

मंदिराचा मुख्य गाभारा लाकडी कोरीवकामाने बनलेला आहे. ज्यामध्ये मध्यभागी देवी एकवीरा आई ची मूर्ती स्थापित केलेली आहे. तिच्या शेजारीच देवी जोगेश्वरी मातेचे मूर्ती स्थापित केलेली आहे.  सोन्याने चांदीने मढवलेले देवीचे मुखवटे हे अतिशय सुंदर दिसतात.

Tips and Things to do

  • Baby showers can be done here.
  • Try to visit early morning or late evening for less crowd.
  • Entry fee is for Carla Caves only, There is no entry fee for Ekvira Temple
  • Best time to visit is during monsoon and winter.
  • You can also explorer karla caves

Best time to visit

  • Navratri and Chaita Saptami for festival and Palkhi ceremony.
  • For less crowds visit this place at late evening after 6:00, So you can also able to see an original idol without mask.

Hotels and food Court

  • There are many amenities available to stay at the foot of the mountain. if you want better facilities, go to nearby Lonavla.
  • food Courts on the road and while walking up the hill as well as near the foot of the mountain.
  • For free food facility visit Swami Datta adhistan near Lonavala.

How to reach Ekvira Temple

Lonavla is a world famous tourist destination, close to Mumbai. Many vehicles such as sharing rickshaws, ST Corporation bus services are also available to reach Ekvira Devi Mandir from Lonavla bus stand. If you are traveling by personal vehicle, you will have to come to Fata by car from Mumbai Pune Old Highway. If you cross a distance of only two kilometers from there, you will reach the car at the foot of the mountain.

मुंबईपासून जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे लोणावळा, हे जग प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. लोणावळा बसस्थानकावरून एकवीरा देवी मंदिराकडे कडे जाण्यासाठी बरीच वाहने जसे की, शेअरिंग रिक्षा, एसटी महामंडळाच्या बस सेवाही उपलब्ध आहेत. आपण वैयक्तिक वाहनाने प्रवास करत असल्यास आपणास मुंबई पुणे जुना हायवे वरून कारला फाटा येथे यावे लागेल. तिथून अगदी दोन किलोमीटर अंतर पार केल्यास आपण कारला डोंगराच्या पायथ्याशी पोहोचाल.

Nearest airport – is Pune international airport which is 93 km.

Nearest railway station – is lonavala railway station which is 12 km

Nearest bus stop – is lonavala Bus stop which is 11 km.

Distance from

Mumbai – 94 km
Pune – 57 km
Nashik – 226 km
Ratnagiri – 354 km
Satara – 163 km
Kolhapur – 307 km
Thane – 99 km

Nearby places to Visit

Categories: ADVENTURETags:
English हिन्दी मराठी
%d bloggers like this: