Sambhaji Maharaj smarak sangameshwar travel guide


Hello, we are going to visit the (monument) smarak of Chatrapati Sambhaji Maharaj, which witnessed the last battle of Chhatrapati Sambhaji Maharaj, the glorious sun of Maharashtra. छत्रपती संभाजी महाराज, Here we will tell you the complete information history, current status, how to reach, tips, places to visit, from our personal experience which can be used as a travel guide while your trip planning.

नमस्कार, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा तेजोमय भास्कर, यांच्या अखेरच्या लढाईचे साक्ष देणारे संभाजी महाराजांचे स्मारक येथे भेट देणार आहोत.  येथील संपूर्ण माहिती इतिहास, सध्याची स्थिती, कसे पोहोचायचे, टिप्स, पाहण्या सारखी ठिकाणे, आमच्या प्रत्यक्ष अनुभवातून आपणास सांगणार आहोत ज्याचा उपयोग आपणास तुमच्या सहलीचे नियोजन करताना Travel guide सारखा करता येईल.

History of Chatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj is a fiery history of the Marathas. Our all-rounder Chhatrapati Sambhaji Maharaj and his 31-year career, expert in 13 languages, writing 3 books, won more than a hundred battles, not only Maharashtra but also the surrounding states by his bravery and diplomacy to unite the Swarajya. Chhatrapati Shivaji Maharaj’s legacy was further doubled. Such is our honor to our King Chhatrapati Sambhaji Maharaj.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांचा ज्वलंत इतिहास. सर्वगुणसंपन्न असे आमचे छत्रपती संभाजी महाराज आणी त्यांची 31 वर्षाची कारकीर्द, 13 भाषांमधे निष्णात, 3 ग्रंथांचे लेखन, शंभराहून अधिक लढाया जिंकल्या, महाराष्ट्रच नव्हे तर अगदी सभोवतालची राज्ये आपल्या शौर्य आणी मुत्सद्दी यांच्या जोरावर जिंकून स्वराज्यात जोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा पुढे द्विगुणित केला. असे आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा.

Tragedy in the life of Chhatrapati Sambhaji Maharaj started from beginning. Early death of his mother when he was just two year old. the imprisonment at Agra with the father at the age of nine, away from the father and the house almost one year while returning from Agra, He was neither able to see or meet his father before his death nor do his last rites at the funeral. After facing all these incidents of poisoning, conspiracies, betrayal, which led to his arrest. And then the inhuman persecution by Aurangzeb and the tragic end at the age of twenty-one.

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील शोकांतिका. वयाच्या दुसर्‍या वर्षी जन्मदात्या आईचे निधन, वयाच्या नवव्या वर्षी वडिलांसोबत आग्रा येथे कैद, पुढे सुटकेसाठी एक वर्ष वडील आणी राहत्या घरापासून दूर, पित्याचे शेवटचे दर्शन ही मिळाले नाही. स्वकीयांकडून विषप्रयोग, कारस्थाने, या सर्व प्रसंगाचा सामना करुन  शेवटी सख्ख्या मेहुण्याने केलेली गद्दारी ज्यामुळे झालेली अटक. आणी पुढे औरंगजेबाकडून झालेला अमानुष छळ आणी वयाच्या 31 व्या वर्षी झालेला त्रासदायक अंत.

Personal experience

We had visited Chhatrapati Sambhaji Maharaj Kasba – Sangameshwar during our Sangameshwar Ratnagiri trip. As soon as you cross the bridge over the river Shastri on the Mumbai-Goa highway, the one-way road on the left immediately takes you closer to the Maharajah’s monument.

आम्ही आमच्या संगमेश्वर रत्नागिरी सहली दरम्यान छत्रपती संभाजी महाराज कसबा –  संगमेश्वर या ठिकाणाला भेट दिली होती. मुंबई गोवा महामार्गावर शास्त्री नदीवरचा पूल ओलांडला की लगेचंच डाव्या बाजूला जाणारा एकेरी रस्ता हा आपल्याला महाराजांच्या स्मारकाच्या जवळ घेऊन जातो.

Advertisements

The monument – Smarak is erected in black stone in the main square at a distance of one to two kilometers. Where Sambhaji Maharaj was arrested. That place is Sardesai’s palace at Sangameshwar. A memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj has been built there. At first glance, this architectural structure looks like the ramparts of a fort. And in the middle of the highest place, the black stone idol of Chhatrapati Sambhaji Maharaj, the sunlight coming from behind you. Reminiscent of the sun in the Maratha Empire.

अगदी एक ते दोन किलोमीटर अंतरावर मुख्य चौकात काळ्या पाषाणात हे स्मारक उभारले गेले आहे. जेथे संभाजी महाराजांना अटक झाली होती. ते स्थान म्हणजे संगमेश्वर येथील सरदेसाई यांचा वाडा. तेथेच छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधले गेले आहे. प्रथम दर्शनी पाहता ही वास्तु रचना ही किल्ल्याच्या तटबंदी सारखी वाटते. आणी मध्यभागी सर्वोच्च ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची काळ्या पाषाणात असलेली मूर्ती त्यांचे दिसणारे तेज मागुन येणारा सूर्य प्रकाश आपणास. मराठा साम्राज्यातील सूर्याची आठवण करून देतो.

Chhatrapati Sambhaji Maharaj had come to Sardesai’s palace to execute judgment that day. Due to internal rebellion, Bhaskara had to go to Astas at the tender age of 31. Hearing this brings to mind a thought. If the lives of Chhatrapati Shambhu Maharaj and Chhatrapati Shivaji Maharaj would have been centenary like other states. In fact, the pages of unbroken history would have been filled with success stories of heroism.

हे माझे छत्रपति त्यादिवशी न्यायनिवाडा करण्यासाठी सरदेसाई यांच्या वाड्यात आले होते. गाफील असताना अंतर्गत बंडाळी मुळे वयाच्या अवघ्या 31 वर्षात या भास्करास अस्तास जावे लागले. हे  ऐकून मनात एक विचार येतो. जर छत्रपति संभाजी महाराज आणी छत्रपति शिवाजी महाराज यांचे आयुष्य जर इतर राजांप्रमाणे शतायुषी झाले असते. तर किंबहुना अखंड इतिहासाची पाने ही पराक्रमाची यशोगाथा लिहून भरून गेली असती.

Sangameshwar’s political significance in history संगमेश्वर चे राजकिय महत्व

Geographically, Sangameshwar is the center of the Raigad fort, the capital and the Panhala fort, borders of the Maratha. Also, Sangameshwar is the nearest place to monitor and manage sea transport, ports like Ratnagiri. Therefore, Sangameshwar was of special importance in the construction of the Maratha Empire. Since Sambhaji Maharaj’s in-laws home in Sringarpur. Which is just 15 km away from sangameshwar, people from the royal family used to come to Sangameshwar often.

भौगोलिक दृष्ट्या संगमेश्वर हे मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला आणी स्वराज्याची सीमा राखणारा पन्हाळा किल्ला यांच्या मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. तसेच रत्नागिरी सारख्या  समुद्र वाहतुक आणी बंदर यावर देखरेख व वचक बसवण्यासाठी संगमेश्वर हे अगदी नजीकचे ठिकाण. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या बांधणीत संगमेश्वर चे विशेष महत्व होते. संभाजी महाराजांची सासर शृंगारपूर हे अगदी 15 किमी असल्याने राजघराण्यातील व्यक्ती बरेचदा संगमेश्वर येथे येत असत.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी. हा श्री चरणी मानाचा मुजरा.

Tips and things to do

  • Chatrapati Sambhaji Maharaj smarak is an open place so you can visit 24/7
  • Sangameshwar is a historical and Spiritual place
  • You can see many above 1000 year old temples in surrounding areas.
  • Best time to visit is in monsoon
  • Food courts : – you can get small hotels here. if you want proper meal you can get hotels on Mumbai Goa highway.
  • Accommodation :- Bhairi Bhavani home stay is available just half km away.
  • If you like trek you can visit Marleshwar and Pawankhind via forest area.

How to reach near Sambhaji Maharaj smarak Kasba Sangameshwar

Kasba is small town of Sangameshwar, and just 1 km away from Mumbai Goa highway next to Shastri river Bridge.

Nearby places to visit

Categories: FORTS, Tourist placesTags: , , ,

2 comments

  1. Nice information

  2. खूप छान लिहीले आहे.सर्वांनी अवश्य भेट देऊन येथील इतिहास च अभ्यास करावा

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d