Unexplored place Hedavde village travel guide tips


Today we are going to visit Hedavade village, unexplored place near vasai and mumbai, just 50 km from mumbai and 15 minutes distance from Mumbai – Ahmedabad highway, we are sharing our family trip experience. about best place for Camping and family trip, scenic river view tourists attraction, beautiful Ram mandir, 879 mahalaxmi temple, and many more fun, adventure and holy place, all available in one place, this will help you as travel guide.

Hedavde village unexplored place

आज आपण हेदवडे गावाला भेट देणार आहोत, वसई आणि मुंबई जवळील कमी माहीत असलेले ठिकाण, मुंबई अहमदाबाद महामार्गापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर, कॅम्पिंग आणि कौटुंबिक सहलीसाठी सर्वोत्तम ठिकाण, पर्यटकांचे आकर्षण निसर्गरम्य नदी चा किनारा आणी झुळझुळणारा वारा , सुंदर राम मंदिर, 879 महालक्ष्मी याविषयी मी माझा सहलीचा अनुभव शेअर करत आहे. मंदिर, आणिअनेक मनोरंजक, साहसी आणि पवित्र ठिकाणे, सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत, हे तुम्हाला प्रवास मार्गदर्शक म्हणून मदत करेल.

Personal experience of unexplored hedavde village

We have visited Hedwade village during our Dahanu road trip. That was it, we left Mumbai in the afternoon to go to Dahanu Mahalakshmi. Between Vasai and Palghar, a river flows on the left hand side and the first and next moment a beautiful marble temple came into view. And turned in that direction due to lack of support.

आम्ही आमच्या डहाणू रोड ट्रिप दरम्यान हेदवडे या गावी भेट दिली होती. त्याचे झाले असे मुंबईहुन आम्ही दुपारी डहाणू महालक्ष्मी येथे जाण्यास निघालो. वसई आणी पालघर दरम्यान डाव्या हाताला एक नदी वाहताना पहिली आणी पुढच्या क्षणीच एक सुंदर संगमरवरी मंदिर नजरेस दिसले. आणी न रहावल्यामुळे त्यादिशेने वळलो.

Ram Temple Hedavde village – राम मंदिर हेदवडे गाव travel guide

We have reached near the marble temple by making a U-turn on the road adjacent to the Mumbai-Ahmedabad highway. It was all a different kind of excitement as it was not pre-planned. There was a parking facility next to the temple. Going to the front of the temple, I realized that this temple is dedicated to Lord Ram. Sculptural example of amazing architectural art.

मुंबई – अहमदाबाद महामार्गापासून शेजारी असलेला रस्त्यावर यूटर्न करून आम्ही त्या संगमरवरी मंदिराजवळ पोहोचलो. हे सर्व पूर्व नियोजित नसल्याने एक वेगळाच उत्साह होता. मंदिराच्या शेजारी पार्किंगची सोय होती. मंदिराच्या समोर जाऊन पाहता हे मंदिर प्रभू रामचंद्रना समर्पित असल्याचे समजले. अप्रतिम वास्तू कलेचे मूर्तिमंत उदाहरण.

मंदिराचा मुख्य दरवाज्याच्या समोरील कमान फारच सुंदर hoti त्यानंतर असलेला लाकडी दरवाजा पार करून आम्ही मुख्य सभामंडपात प्रवेश केला. भव्य असा हा सभामंडप आणी त्यावरील जमीन ही संगमरवरी होती. तीनही बाजूस दरवाजे आणी खिडक्या असल्याने सूर्यप्रकाश संपूर्ण मंदिरात पसरला होता. समोर असलेल्या चौथर्‍यावर श्री रामचंद्र, सीता आणी लक्ष्मण यांच्या मूर्त्या विराजमान होते. त्याचे दर्शन घेऊन मदिरा बाहेर असलेल्या शिवमंदिराचेही दर्शन घेतले.

Scenic Tansa river side view and camping Unexplored place

we headed towards Tansa river. And in just five minutes on a dirt road, we reached the riverside. From the river bank road to the inland coast, we experienced a bit of a rough road. Reaching near the river, seeing the nature in front, decided to spend some time there

दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही तानसा नदीच्या दिशेने निघालो. आणी एका चिंचोळी रस्त्याने फक्त पाच मिनिटातच आम्ही नदी शेजारी पोहोचलो. नदी चा किनारा हा रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूस असलेल्या किनार्‍यावर जाताना थोडा ओबडधोबड रस्त्याचा ही अनुभव घेतला. नदी जवळ पोहोचतात समोरच असलेला निसर्ग पाहून तेथे काही वेळ व्यतीत करायचे ठरवले.

The wind was blowing and the wide expanse of the river Tansa in front of it looked very attractive. Free space around. So we found this a great place for camping near mumbai.

The wind was blowing and the wide expanse of the river Tansa in front of it looked very attractive. Free space around. So we found this a great place to camp. There we saw some stone stoves. We noticed that. That many people like us must be coming here for camping and picnics.

Advertisements

वारा झुळझुळ वाहत होता समोर असलेले तानसा नदी चे विस्तीर्ण पात्र फारच आकर्षक दिसते होते. सभोवताली मोकळी अशी जागा. त्यामुळे हे एक कॅम्पिंग करण्यासाठी उत्तम जागा आम्हास सापडली. तेथे आम्ही काही दगडी चुली पहिल्या. ते पाहून आमच्या लक्षात आले.  की आमच्या सारखे अनेक लोक येथे camping आणी वनभोजन कारणासाठी येथे येत असावेत.

We had brought our food with us while leaving home. Great chickpeas and jirarice with it. So it was very fun to arrange a meeting in such a scenic place and get a new experience of food. After the meal we tried to capture some time like this in pictures with the amazing nature.

घरातून निघताना आम्ही आमचे जेवण सोबत आणले होते. मस्तं छोले आणी सोबत जीराराइस. त्यामुळे अश्या निसर्गरम्य ठिकाणी बैठक मांडून आम्ही जेवणाचा एक आगळा अनुभव घेताना फार मजा आली. जेवणाच्या नंतर आम्ही असाच काही काळ त्या अप्रतिम निसर्गाच्या सोबत छायाचित्रात साठवण्याचा प्रयत्न केला.

879 Mahalaxmi temple Hedavade village

879 Mahalaxmi temple Hedavade village
  • What does 879 mean, what is this sign or what is the lucky number? Let us consider this question in detail.
  • 879 याचा अर्थ काय, हे कोणते चिन्ह आहे की कोणता लकी नंबर आहे असा विचार प्रत्येकाच्या मानत आल्या शिवाय राहत नाही. या प्रश्नाचा सविस्तर विचार करूया.
  • 8 = Whom work does not begin without worship. That’s Shri Ganesha. They have eight main temples which are referred to as Ashtavinayakas. derived from it. The number 8 must have come from it.
  • 8 = ज्याची उपासना केल्याशिवाय कार्य सुरू होत नाही. असे श्री गणेश. त्यांची आठ मुख्य मंदिरे आहेत ज्यांना अष्टविनायक असे संबोधले जाते. त्यामधून आलेला. त्यातून 8 हा अंक आला असावा.
  • 7 = Sage is a devotee of spirituality. His contribution in many religious activities is very important. Sage Shrestha is Saptarshi who has been given this honorable place by God in space. The number 7 must have come out of it.
  • 7 = ऋषी म्हणजे अध्यात्माचे उपासक अनेक धार्मिक कार्यात यांचे योगदान फार महत्त्वाचे.  ऋषी श्रेष्ठ म्हणजे सप्तर्षी ज्यांना देवाने अवकाशात ही मानाचे स्थान दिले आहे. त्यातून 7 हा अंक आला असावा.
  • 9 = Those who influence our daily life as well as our future. And in whose hands lies the immense power to change our destiny. Such a Navagraha. From this may have come the number 9.
  • 9 = आपल्या दैनंदिन जीवनावर तसेच आपल्या भविष्यावर ज्यांचा प्रभाव असतो. आणी आपले नशीब बदलण्याचे प्रचंड सामर्थ्य ज्याच्या  हातात आहे. असे नवग्रह. यापासून 9 हा अंक आला असावा.

The place where all the three deities and sages meet together is the 879 Mahalakshmi temple in Hedwade village.

या तीनही देवदेवतांच्या आणी ऋषी मुनींचे एकत्रित दर्शन घेण्याचे ठिकाण म्हणजे 879 महालक्ष्मी मंदिर हेदवडे गाव.

The temple of 879 Mahalakshmi is very different and it’s open only on certain days. Devotees cannot go to Darshan on other days. Outside the temple is a magnificent idol of the remaining serpent. Also Navagrahas are seated in the temple. The idol of Mother Mahalakshmi is very rare. It is strictly forbidden to take photos in the temple premises. So he was not photographed there out of respect.

Please visit official website for images and more details https://www.hedavdemahalaxmi.com/

We are declared that, Below indicative image capture from official website for informing our visitors about official website of 879 mahalaxmi temple.

https://www.hedavdemahalaxmi.com

श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर हे फार आगळ वेगळ ते फक्त ठराविक दिवशीच उघडे असते. इतर दिवशी भाविकांना दर्शनास जाता येत नाही. मंदिराच्या बाहेर शेष नागाची भव्य मूर्ती आहे. तसेच नवग्रह देखील मंदिरात विराजमान आहेत. श्री महालक्ष्मी मातेची मूर्ती फारच दुर्मिळ आहे. मंदिराच्या आवारात photo काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे त्याचा मान ठेवून तेथे छायाचित्रण केले नाही.

Tips and Things to do hedavde village

  • Ram Mandir is easily visible from Ahmedabad Mumbai Highway. 879 The Mahalakshmi temple is a little inland in the village.
  • 879 Mahalakshmi Temple is open only on Fridays
  • Unexplored place, The spot we chose for camping is on the left side between Ram temple and 879 Mahalakshmi temple.
  • Best time to visit Anytime of the year
  • Food courts: – Food courts available near Ram mandir, you can also enjoy various tasty food near Charoti.
  • राममंदिर हे अहमदाबाद मुंबई हायवे येथून सहज नजरेस येते. 879 महालक्ष्मी मंदिर गावात थोड्या आतील बाजूस आहे.
  • 879 महालक्ष्मी मंदिर हे फक्त शुक्रवारी भाविकांसाठी उघडे असते
  • कॅम्पिंग साठी आम्ही निवडलेली जागा ही राम मंदिर आणी 879 महालक्ष्मी मंदिर दरम्यान डाव्या बाजूस आहे.

How to reach hedavde 879 Mahalaxmi temple

  • Nearest railway station i7.00s Vaitarna on Western railway 27 Km
  • Nearest airport is 54 Km
  • hedavde Distence from nearby cities
  • Mumbai = 64 Km
  • Pune = 192 Km
  • Nashik = 158 Km
  • Surat = 228 Km
  • Ahmedabad = 263 Km
  • Kolhapur = 642 km

Nearby places to visit – places click on below links for more details

Categories: HOLY PLACES, Tourist places, UNKNOWN PLACESTags: , , , , , , ,

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d