Gargoti the mineral museum travel guide tips


Hello everyone, today we are going to visit a different building. Pebbles – A collection of natural diverse rocks, minerals, rare gems and equally fascinating artefacts of nature. Where there are minerals of gold and diamonds along with the remains and gems of the moon and other planets. In this section we will share with you the complete information about Gargoti Museum, our actual visit experience, how to reach here, some important tips, photos, things to see. Which you can use like a travel guide. Address Gargoti the Mineral Museum,
D-59, MIDC Malegaon, Sinnar, Nasik 422113 Maharashtra, India.

नमस्कार मंडळी, चला आज आपण एका आगळ्या वेगळ्या वास्तूला भेट देणार आहोत. गारगोटी – नैसर्गिक विविधांगी खडकाचा, खनिजांचा, दुर्मिळ रत्नांचा आणी तेव्हढाच आकर्षक निसर्गाच्या कलाकृतींचा संग्रह. जेथे सोने हिरे यांची खनिजे आहेत व त्या सोबत चंद्र तसेच इतर ग्रहांचे अवशेष व रत्ने आहेत. या भागात गारगोटी संग्रहालयाची संपूर्ण माहिती, आमचा प्रत्यक्ष भेटी दरम्यानचा अनुभव, येथे कसे पोहोचायचे, काही महत्व पूर्ण टिप्स, छायाचित्र, पाहण्यासारख्या गोष्टी आपल्या सोबत शेअर करणार आहोत. ज्याचा उपयोग आपणास travel guide सारखा करता येईल. गारगोटी खनिज संग्रहालय, मुक्काम पोस्ट सिन्नर जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, भारत.

Gargoti mineral museum travel guide

Information about Gargoti mineral museum

This museum named Gargoti is a result of the tireless efforts of Hon’ble Shri K Pandey. And the consistency is born from over forty years of hobby. There is actually a vastu museum inaugurated by late Balasaheb Thackeray. A word that is used very easily in the word pebble has been carefully used here to have a very implied meaning. There are so many precious artefacts of nature in the form of stones, clay, crystals are present around us. Which we unintentionally ignore because they are everyday. But after examining it carefully, the hidden beauty and genius of art in it is the Gargoti mineral museum Museum Sinner.

गारगोटी या नावाने असलेले हे संग्रहालय म्हणजे माननीय श्री के पांडे यांच्या अथक प्रयत्नातून. आणी सातत्य पूर्ण चाळीसहून अधिक वर्षाच्या छंदा पासुन निर्माण झालेले. प्रत्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेले वास्तु संग्रहालय आहे. गारगोटी या शब्दात फार सहज पणे वापरल्या जाणार्‍या शब्दाचा फार गर्भित अर्थ येथे विचार पूर्वक वापरला गेला आहे. तो असा निसर्गाच्या अनमोल अश्या असंख्य कलाकृती दगड माती, स्फटिक यांच्या स्वरुपात आपल्या अवतीभवती उपस्थित आहेत. ज्या आपण अनावधानाने किव्वा रोजच्या झाल्याने दुर्लक्षित करतो. पण त्या अभ्यासपूर्वक तपासल्या नंतर त्यातील त्याच्या मध्ये दडलेले सौंदर्य आणी अलौकिक कलाविष्कार म्हणजे गारगोटी संग्रहालय सिन्नर.

What are crystals and how are they formed?स्फटिक म्हणजे काय ती कशी तयार होतात.

How are crystals formed inside stones? How do you understand it? H they stored? These questions would have come to your mind. Briefly speaking about this. Due to changes in nature like volcanoes, floods, tsunamis, earthquakes, heavy rains, temperature, many events are taking place underground. It results in certain surroundings. It can be tested for soil testing there. From which the surrounding stones are gently broken using sophisticated techniques from which these types of crystals and some rare metals are collected. Some of these crystals are so fragile that they can be shattered with a little more pressure.

दगडांच्या आत स्फटिके कशी तयार होतात ? ती कशी समजतात ? ती संग्रहित केली जातात ? हे प्रश्न आपल्या मनात आले असतिल. या बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर. निसर्गाच्या होणार्‍या बदलामुळे जसे ज्वालामुखी, पूर, सुनामी, भूकंप, अतिवृष्टी, तापमान यांमुळे भूगर्भात अनेक घडामोडी घडत असतात. त्याचा परिणाम हा सभोवतालच्या ठराविक परिसरात होतो. त्याची चाचणी ही तेथील मातीच्या चाचणीसाठी करता येते. ज्यातून सभोवतालचे दगड अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून हळुवार पणे फोडले जातात ज्या मधून या प्रकारची स्फटिक आणी काही दुर्मिळ धातू संग्रहित केले जातात. यातील काही स्फटिके एव्हढी नाजूक असतात थोड्या अधिक दाबाने ती विखुरली जाऊ शकतात.

Mineralisat process

Hot lava contents in cavities amygdales,
veins and cracks circulating water (steam) under high pressure, which can solve glass and primary grown minerals. After reduction of pressure and temperature of the solution a second gencration of minerals will be developed. The type of the minerals is depending from the composition of solution and other surrounding conditions Cold basalt.

अमिग्डेल्सच्या पोकळीतील गरम लावा सामग्री,
शिरा आणि क्रॅक उच्च दाबाखाली पाणी (वाफेवर) फिरते, जे काच आणि प्राथमिक वाढलेली खनिजे सोडवू शकतात. द्रावणाचा दाब आणि तापमान कमी केल्यानंतर खनिजांची दुसरी निर्मिती विकसित केली जाईल. खनिजांचा प्रकार द्रावणाच्या रचनेवर आणि कोल्ड बेसाल्टच्या आसपासच्या परिस्थितीवर अवलंबून असतो.

Advertisements

Personal experience Of visiting to Gargoti the mineral museum

We visited the Gargoti Crystal Museum during our Nashik Inner Trip. The museum is located at Midc at Sinnar in Nashik district. whose entry fee is Rs. 100 and we are giving more information in this section Tips. Free guide chi is provided in the museum. The museum is housed in a two-storied building. After entering, there are various crystal artefacts at the beginning. We entered the next area where we saw the idol of Shri Ganesha made from ruby stone, Shiva pindi made from transparent crystals found in the Himalayas, this more transparent and amazing art work than even water.

आम्ही आमच्या नाशिक सिन्नर ट्रीप दरम्यान गारगोटी स्फटिक संग्रहालयाला भेट दिली होती. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील Midc येथे हे संग्रहालय आहे. ज्याची प्रवेश फी Rs. 100 असून अधिक माहिती आम्ही टिप्स या सदरात देत आहोत. संग्रहालयात मोफत guide chi सोय करून दिली गेली आहे. संग्रहालय हे दुमजली इमारतीत बनवले गेले आहे. प्रवेश केल्यानंतर सुरुवातीस विविध स्फटिकाच्या पासून बनवण्यात आलेल्या कलाकृती आहे. ज्यामधे माणिक दगडा पासून बनवलेली श्री गणेशाची मूर्ती, हिमालयात सापडणाऱ्या पारदर्शक स्फटिकांन पासून बनवण्यात आलेली शिव पिंडी अगदी पाण्यापेक्षा ही अधिक पारदर्शक आणी अप्रतिम कलाकृती पाहून आम्ही पुढील भागात प्रवेश केला.

Here various pieces of rock were found which looked just like the rocks around us but inside they were found to contain multi-colored crystals. Seeing many such rocks we proceeded further. Each rock was marked with its name and complete information about where it was brought from. In which the chief named Maharashtra, Gujarat, Rajasthan, Himalayas, Marve Sea coast in Mumbai, Brahm region, and many countries of the world.

येथे विविध खडकांचे तुकडे आढळे जे वरुन पाहता अगदी आपल्या सभोवतालच्या खडकांनप्रमाणे दिसले पण त्यांच्या आत विविधरंगी स्फटिक असल्याची आढळली यावरून ही स्फटिक कोठे सापडतात मनातील एका प्रश्नाचे उत्तर मिळाले. अशेचे अनेक खडक पाहत आम्ही पुढे निघालो. प्रतेक खडकांवर त्याचे नाव आणि तो कोठून आणला गेला याची संपूर्ण माहिती नमूद केली गेली होती. ज्यात प्रमुखाने, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमालय, मुंबई येथील मार्वे समुद्र किनारा, ब्रम्ह प्रदेश, आणी जगातील अनेक देशांची नावे दिली होती.

Fire Cristel and color changing Cristels

After seeing it, we proceeded towards the garden where we saw a beautiful statue of Bharat Mata next to the stairs. Moving on from there, thousands of different crystals were beautifully displayed in many showcases. Which included gold, silver, rubies, gems used for the peace of Nava planets. Some of the surprising ones were the speckles. In which, like radium, glows at night, changes color, looks like a fire burning in blue light. Many such rare crystals were seen. We were mesmerized and engrossed in witnessing the unimaginable art of nature.

ते पाहिल्यानंतर आम्ही पाहिल्या माळ्याच्या दिशेने निघालो जिन्याच्या शेजारी भारत मातेची सुंदर मूर्ती दृष्टीस आली. तेथून पुढे गेल्यावर हजारो विविध स्फटिक अनेक शोकेस मध्ये फार सुंदरपणे प्रदर्शित केली गेली होती. ज्यात सोने, चांदी, माणिक, नव ग्रहांच्या शांती साठी वापरण्यात जाणारी रत्ने यांचा समावेश होता. त्या मध्ये काही थक्क करणारी त्यामध्ये स्पटिके ही होती. ज्यामध्ये रेडियम प्रमाणे रात्रीच्यावेळी चमकणारी, रंग बदलणारी, निळ्या प्रकाशामध्ये धगधगत्या आगी सारखी दिसणारी. अशी अनेक दुर्मिळ स्फटिक पाहावयास मिळाली. आम्ही मंत्रमुग्ध होऊन निसर्गाची अकल्पनीय कलाकुसर पाहण्यात तल्लीन झालो.

The sedimentary rocks in the next section are very well preserved and contain biological remains, some features of dinosaurs, comets and other planetary remains. Mainly the good arrangement, lighting scheme and the treasure of rare minerals and crystals that Hon’ble Shri K Pandey has opened for us. This article is an attempt to pay tribute to his hard work in collecting these rare cases.

पुढील विभागातील गाळाचे खडक आणी त्यात सामावलेले जैविक अवशेष, डायनासोर्स चे काही विषेश, धूमकेतू आणि इतर ग्रहांचे काही अवशेष अगदी छान प्रकारे संग्रहित केले आहे. मुख्य म्हणजे उत्तम व्यवस्था, प्रकाश योजना आणी दुर्मिळ खनिज आणी स्फटिक यांचा खजिना माननीय श्री के पांडे यांनी आपल्या साठी खुला करून दिला आहे. या दुर्मिळ गोष्ठी गोळा करताना घेतले गेलेले त्याचे परिश्रम यांना या लेखा द्वारे एक मानाचा मुजरा देण्याचा हा प्रयत्न धन्यवाद.

Tips and Things to do in Gargoti mineral museum

 • Gargoti mineral museum tickets = Rs. 100/ Person Guide fees is included in ticket
 • Gargoti mineral museum timing = 9:30 am to 6 pm.
 • Most of the Cristels are unique but we like more fire Cristel and tranferent Cristel lord Shiva Pindi.
 • Dinosaurs, comet, Remains of other planets is unbelievable.
 • Gold and silver stones are also available
 • ALL Cosmic energy Cristels which have a spiritual significance are available in their row are in original form.
 • The statue of Bharat Mata in the center of the museum is a symbol of love for one’s country
 • Among the idol made there, the idol of leady with the veil on the head seems very beautiful.
 • Best time to visit is anytime in year but If you want to experience of cool climate then winter is a best season.
 • Gargoti museum contact details = official website links
 • Aim of this post to spread information and help them to visit this rare and diminishing museum.

How to reach Gargoti mineral museum Sinnar travel guide

Places to visit Near Gargoti mineral museum

Categories: Tourist places, UNKNOWN PLACES

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d