Menawali ghat travel guide Bollywood film favorite location


Hello everyone, today we are going to visit Menawali, the favorite shooting location of Mumbai’s Bollywood movies. Place with historical heritage, things to see here, best place for pre-wedding photos, list of movies, how to reach here, along with a hotel where cine stars stay. We have brought all such rich information for you in Marathi as well as English language. Which you can use like a travel guide. Menwali Ghat, Taluka Yai District Satara, Maharashtra India.

Menawali ghat teavel guide Bollywood film favorite location

नमस्कार मंडळी आज आपण मुंबई च्या Bollywood सिनेमांना भुरळ घालणाऱ्या शूटिंग लोकेशन मेणवली येथे भेट देणार आहोत. ऐतिहासिक वारसा असलेले हे ठिकाण, येथे पाहण्यासारख्या गोष्टी, प्रि-वेडिंग फोटो साठि उत्तम ठिकाण, चित्रपटांची यादी, येथे कसे पोहोचायचे, त्या सोबत एक हॉटेल जेथे सिने तारकांची राहण्याची सोय केली जाते. अशी सर्व खुमासदार माहिती मराठी तसेच इंग्रजी भाषेत तुमच्या साठी घेऊन आलोय. ज्याचा उपयोग आपणास travel guide सारखा करता येईल. मेणवली घाट, तालुका वाई जिल्हा सातारा, महाराष्ट्र भारत.

Which movies are shot in Menawli ?

Hundreds of movies have been shot in Menvali. List will be long. So I am trying to remind you the names of some recent movies and their scenes. The scene of Ajay Devgn coming out of the water in the movie singam, the village set in the movie Chennai Express is built between Menavali and Dhom Dam. All the movies Gangajal, Swadesh have been shot in Menwali.

कोणते चित्रपट मेणवली येथे चित्रित केले आहेत ?

सुबोध भावे यांचा हर महादेव. तसेच बरेच मराठी ऐतिहासिक चित्रपटांचे चित्रीकरण मेणवली करण्यात आले आहे. अश्या शेकडो चित्रपटांची यादी बरीच मोठी होईल. त्यामुळे हल्लीच्या काळातील काही चित्रपटाची नावे आणी त्यातील सीन आपणास आठवून देण्याचा प्रयत्न करत आहे. Singam या चित्रपटातील अजय देवगण पाण्यातून बाहेर येण्याचा सीन, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील गाव हा सेट menavali आणी धोम धरण दरम्यान उभारण्यात आला आहे. गंगाजल, स्वदेश या सर्व चित्रपटांचे चित्रीकरण मेणवली येथे झाले आहे.

History of Menawali ghat – मेनावली घाटाचा इतिहास

To see the history of Menwali Ghat, We have to go back to the Peshwa period. Nana Fadnavis, chief of finance department of the Peshwas, received this village as a reward. Therefore, he beautified many places in this village as well as in the surrounding area. Menavali ghat is one of them. The house of Nana Fadnavis is famous as Nanafhadanvis Wada in this neighborhood. Satara was the capital of the Chhatrapatis and the Wai and its surroundings were built by the Peshwas in a strong and spiritual way, so many historical structures are located in this area.

मेणवली घाट याचा इतिहास पाहण्यासाठी आपणास पेशवे काळात जावे लागेल. पेशव्यांचे प्रमुख कारभारी नाना फडणवीस यांना हे गाव बक्षीस स्वरुपात मिळाले. त्यामुळे या गावास तसेच सभोवतीच्या परिसरातील अनेक जागांचे त्यांनी सुशोभीकरण केले. Menavali ghat हा त्यापैकी एक. या शेजारीच नाना फडणवीस यांचे घर Nanafhadanvis वाडा म्हणुन प्रसिद्ध आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आणी पेशव्यांनी सशक्त आणी आध्यात्मिक रुपात वसवलेले वाई आणी सभोवतालचे परिसर त्यामुळे या भागात बरीच ऐतिहासिक वास्तू वसलेल्या आहेत.

Advertisements

Architecture of Menawali Ghat

Menavali ghat is located on the banks of river Krishna. It has a very mesmerizing design with steps descending on three sides with the Beautiful Krishna Mai riverbank on one side. This magnificent area is very fascinating. There is a temple of Shri Mahadev Shiva Shankar on one side of the ghat and in front of an iron bell temple.

Menawali घाट हा  कृष्णा नदीच्या किनार्‍यावर वसलेला घाट आहे. याची रचना अगदी मन मोहक स्वरूपाची आहे.ज्याच्या तीन बाजूस उतरणार्‍या पायर्‍या एका बाजूने संथ वाटणारी कृष्णा माई नदी आहे. हा भव्य असा परिसर फारच विलोभनीय आहे. घाटाच्या एकाबाजूला श्री महादेव शिव शंकराचे मंदिर आहे. आणी त्याच्या समोरासमोर एका लोखंडी घंटेचे मदिर आहे.

Bells of Vasai Fort at Menawali Ghat – वसई किल्ल्यातील घंटा Menavali घाटावर

Think about it! Yes, the bells of Vasai Fort should be considered as a symbol of Peshwa era. Peshwa Chimaji appa rode to Vasai fort. And conquered the fort of Vasai by his prowess. At that time, as a reminder of that feat, he brought a magnificent bell from Vasai with him to Pune and further immortalized the success story of the feat by building a temple dedicated to that bell.

विचारात पडलात! हो वसई किल्ल्यातील घंटा ही पेशवेकालीन पराक्रमाचे प्रतीक मानले पाहिजे. पेशवे Chimaji appa यांनी  वसई किल्ल्यावर स्वारी केली. आणी आपल्या पराक्रमाने वसई चा किल्ला जिंकून घेतला. त्यावेळी त्या पराक्रमाची आठवण म्हणुन वसई येथील एक भव्य घंटा त्यांनी आपल्या सोबत पुण्यास घेऊन आले आणी पुढे त्या घंटेचं रूबाबदार मंदिर बनवून पराक्रमाची यशोगाथा अजरामर केली.

Why menavali favorite destination of Bollywood film makers ?

Menavali is a very close tourist destination from Pune and Mumbai. Where there is perennially flowing river Krishna. Due to which the surroundings are always cheerful. Here the ancient temples, historical buildings are the epitome of fine architectural art. After that the geographical area near here. Dhom Dam on one side, tourist spots like Mahabaleshwar and Pachgani on the other side, dense forest of Javali nearby, Tosegaar waterfall, Kaspathar are all complementary places for film making. This makes it easy to shoot all kinds of scenes for a full movie in and around menavali and also because of its low cost, it has become a favorite spot for Bollywood film makers.

मेनावली हे ठिकाण पुणे आणी मुंबई पासून अगदी जवळचे पर्यटन स्थळ आहे. जेथे बारमाही वाहणारी कृष्णा नदी आहे. ज्यामुळे सभोवतालचा परिसर सदैव प्रफुल्लित असतो. येथे प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू ही उत्तम वास्तू कलेचे प्रतीक आहे. त्या नंतर येथून जवळ असलेला भौगोलिक परिसर. एकाबाजूला धोम धरण, दुसर्‍या बाजूला असलेली महाबळेश्वर आणी पाचगणी सारखी पर्यटन स्थळे, जवळील जावली चे घनदाट जंगल, ठोसेगार धबधबा, कासपठार ही सर्व ठिकाणे चित्रपट निर्मिती साठी पूरक आहे. यामुळे मेनावली आणी सभोवतालच्या परिसरात पूर्ण चित्रपटाचे सर्व प्रकारचे सीन छायाचित्रे करणे सोपे जाते त्याच प्रमाणे हे ठिकाण कमी खर्चिक असल्याने हे Bollywood film makers चे आवडते ठिकाण बनले आहे.

Tips and things to see at Menavali ghat

  • Best time to visit is after monsoon or in winter.
  • Parking facility is available outside in nominal cost
  • Photogray is video shooting is allowed for individual.
  • Its a private property so for pre-wedding or any Comercial photography you have to take an prior permission from Fhadanvis and menavalikar.
  • Food court: Food court are available in wai Speshaliti misal pav, Jaggery tea.
  • Accommodation : There are multiple Accommodation option in wai you can choose according to your budget. We used recommend Sandesh resort. The best hospitality and good management.
संदेश रिसॉर्ट वाई, बरेच मराठी चित्रपटांचे कलाकार शूटिंग दरम्यान याच हॉटेल मध्ये वास्तव्य करतात. हल्लीच्या काळातील पावनखिंड, फत्ते शिकस्त या ऐतिहासिक चित्रपटाचे प्रमुख कलाकारांनी येथे वास्तव्य केले आहे.

How to reach Menawali ghat

Wai is a nearest citi to visit menavali, you can get private vehicle or State transport buses for Menavali. Click on below map link to set map.

Nearby places to visit – Click on images for more details

Kas patelu travel guide

Categories: Tourist placesTags:

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: