Hello Congregation Today we are going to visit a lesser known Guru Panchayatan Sansthan Samarth Wadi, another spiritual center dedicated to Sri Swami Samarth and 16 Datta Avtar temple. The complete information in Marathi and English, spiritual practice, architecture, our experience, Annachhatra, activities, center founder Paramahansa Sakha is sharing with you. Which you can use like a travel guide for spiritual progress. Address Gurupanchayatan Sansthan Samarth wadi, Neral – Badlapur Rd, district thane, Maharashtra 421503 India.

नमस्कार मंडळी आज आपण श्री स्वामी समर्थ आणी 16 दत्त अवतार यांना समर्पित एका कमी माहीत असलेल्या गुरूपंचायतन संस्थान, समर्थ वाडी या आगळ्यावेगळ्या आध्यात्मिक केंद्रास भेट देणार आहोत. येथील संपूर्ण माहिती, आध्यात्मिक साधना, आर्किटेक्चर, प्रत्यक्ष भेटतील आमचा अनुभव, अन्नछत्र, उपक्रम, केन्द्र संस्थापक परमहंस सखा यांची माहिती आपल्या सोबत शेअर करीत आहे. ज्याचा उपयोग तुम्हास आध्यात्मिक प्रगतीस travel guide सारखा करता येईल. पत्ता गुरुपंचायतन संस्था समर्थ वाडी, नेरळ – बदलापूर रोड, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३ भारत.

What is Guru Panchayatan ? गुरू पंचायतन म्हणजे काय ?

Earlier Panchayatan section. We have given detailed information about Panchayatan. Let us understand Guru Panchayatan with brief reference to it. Number 5 has special significance in this universe. Be it Pancharati used during Aarti or Nevaidya of Pancha Panchapakvanna. Similarly, the five Panchamahabhuta are Agni, Vayu, Jal, Akasha and Dhara. Guru Panchayatan is an attempt to bring five Gurus together and bring about world salvation and spiritual progress through them.

या पूर्वीच्या पंचायतन या भागात आपण पंचायतन बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्याचा थोडक्यात संदर्भ घेऊन आपण गुरू पंचायतन हे समजून घेऊ. या विश्वात 5 या अंकास विशेष महत्व आहे. आरती करताना वापरण्यात येणारी पंचारती असो की पंच पंचपक्वान्नाचा नेवैद्य असो. त्याच प्रमाणे पंचमहाभुते अग्नी, वायु, जल, आकाश आणी धरा. हाच योग ध्यानी धरून पाच गुरूंना एकत्रित आणून त्यांच्या द्वारे जगतउद्धार आणी आध्यात्मिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयास म्हणजेच गुरू पंचायतन.
Conception and establishment of Guru Panchayatan – गुरू पंचायतन ची संकल्पना आणी स्थापना

The concept of Guru Panchayatan was brought into being by the spiritual Vibhuti popularly known as Sri Swami Sakha. He renamed the place as Samarth Wadi after his adoring Guru i.e. Datta Avatar Sri Swami Samarth. Five Gurus were established here by Sri Swami Sakha. Every question can be answered by this spiritual energy at this Guru Panchayatan. Its indications can be experienced in the locality here. Sun rays come daily to have direct darshan of this guru. Following are the names of established Gurus.

- Shripad Shri Vallabh – Peethapur श्रीपाद श्री वल्लभ – पीठापूर
- Sri Narasimha Saraswati Gangapur – श्री नरसिंह सरस्वती गाणगापूर
- Sri Swami Samarth – Akkalkot श्री स्वामी समर्थ – अक्कलकोट
- Krishna Saraswati – कृष्ण सरस्वती
- Kumbhar Swami – Kolhapur – कुंभार स्वामी – कोल्हापूर
गुरू पंचायतन ही संकल्पना श्री स्वामी सखा म्हणुन प्रसिद्ध असलेल्या आध्यात्मिक विभूतीॅनी अस्तित्वात आणली. त्यांनी त्यांचे आराध्य गुरू म्हणजेच दत्त अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या नावे या ठिकाणाचे नामांतर समर्थ वाडी असे करण्यात आले. येथे श्री स्वामी सखा यांनी त्यांच्या आराध्य गुरू यांची स्थापना करून घेतली. जणू पाच पंच या विश्वाचा न्याय निवाडा करण्यासाठी एकात्र बसले आहेत. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या गुरू पंचायतन येथे आध्यात्मिक ऊर्जे ने मिळविता येते. त्याचे संकेत येथील परिसरात अभ्यासपूर्वक अनुभवता येतात. सूर्याची किरणे रोज या गुरूंचे थेट दर्शन घेण्यासाठी येतात. स्थापित केलेल्या गुरूंची नावे वर दिली आहेत.

They are jointly established. Photography is not allowed inside primises so we respect that.

16 Datta Avtar temple at Guru panchayatan
After that there are temples of 16 Datta avatars. Whose designs are made according to the art of the Moon. It shows the ingenuity of the architecture. As we know moon shows its many shades from new moon to full moon and its light falls in different ways. Similarly, every day only one of the 16 temples of Datta avatar shines on the Datta idol in one temple. Thus a fine integration of spiritual and vidnyan is seen here by Vastu thinkers and architecture.

त्या नंतर येथे 16 दत्त अवताराची मंदिरे आहेत. ज्यांची रचना चंद्राच्या कले नुसार बनवण्यात आली आहे. यात वास्तु रचनेच्या कल्पकतेचे दर्शन घडते. महत्त्वाचे म्हणजे चंद्र जसा अमावस्या ते पौर्णिमा आपल्या अनेक अनेक छटा दाखवतो आणि त्याचा प्रकाश वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतो. त्या प्रमाणे दर दिवशी 16 दत्त अवताराची मंदिरान पैकी फक्तं एकाच मंदिरातील दत्त मूर्तीवर चंद्र प्रकाशने उजळून निघते. अश्या प्रकारे आध्यात्मिक आणी vidnyan यांचे उत्तम एकत्रीकरण येथे वास्तू विचारवंतांनी केलेले दिसते.

Along with Dattamandira, there are three and a half Shaktipeeths, Gomata, Lord Hanuman, Radhakrishna and many other temples can be seen around. The entire area is 10 to 24 acres in size. Organic farming is practiced here. While building a farm pond, they found a foot shaped stone. It’s lile Guru Charan paduka so they built separate temple. They held some other activities just like sadhana classes and Lectures. It takes at least two hours to walk around the entire area. This spiritual center will give you further energy.

दत्तमंदिरा सोबत साडेतीन शक्तिपीठ, गोमाता, भगवान हनुमान, राधाकृष्ण, अशी अनेक मंदिरे सभोवताली पाहता येतील. हा एकंदर परिसर 10 ते 24 एकर इतका भव्य आहे. येथे सभोवताली सेंद्रिय शेती केली जाते. त्यासाठी शेत तलाव बांधताना एक पायाच्या आकारांची दगडी शिळा सापडली. त्याचे ही मंदिर येथे बांधण्यात आले आहे. येथे काही साधना वर्ग. प्रवचने यांच आयोजन केले जाते. संपूर्ण परिसर फिरण्यासाठी किमान दोन तासांचा वेळ लागतो. असे हे आध्यात्मिक केंद आपणास आगळी ऊर्जा मिळवून देईल.
Our experience at Guru Panchayat Samarth Wadi – गुरू पंचायतन समर्थ वाडी येथील आमचा प्रत्यक्ष अनुभव

As usual while exploring the temples of Sri Swami Samarth, we got information from some friends about the Guru Panchayatan at Samarth Wadi, vangani in Badlapur Taluka. We were reached Samarthwadi, just half a kilometer from the main road near vangani village on the Neral Badlapur road. There was ample parking facility outside the temple. An idol of Swami is installed outside as if Swami himself is welcoming his devotees with affection.

नेहमी प्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या मंदिरांचा शोध घेताना आम्हास बदलापूर तालुक्यातील वांगणी, समर्थ वाडी येथील गुरू पंचायतन बद्दल काही मित्रमंडळींकडून माहिती मिळाली. नेरळ बदलापूर रोडवर वांगणी गावाजवळ मुख्य रस्त्यापासून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर आम्ही समर्थवाडी येथे पोहोचलो. मंदिराच्या बाहेर पुरेशी सोय पार्किंग ची सोय होती. बाहेरच स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे जणू काही स्वामी स्वतः आपल्या भक्तांचे आपुलकीने स्वागत करीत आहेत.

From there the below image of Swami on the chariot is seen where Swami himself has come here accompanied by all the Datta Sampradaya. After entering through the main entrance, the whole atmosphere was filled with Swami samarth. The reason for this is that wherever we looks, Swami, Swami idols in many forms, sometimes under a tree, sometimes on a step, sometimes in the form of Annapurna, Swami in the true sense of the word of Samarthwadi. was happy to see.

तेथून पुढे स्वामींची रथावरील वरील मूर्ती दिसून आली जेथे स्वामी स्वतः सर्व दत्त संप्रदाय यांना सोबत घेऊन येथे आले आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सर्व वातावरण स्वामी मय झाले होते. याचे कारण म्हणजे जेथे जिथे नजर जाईल तिथे सर्वत्र स्वामी, अनेक रूपातील स्वामी मूर्त्या कधी झाडाखाली कधी पायरीवर कधी पाळण्यावर, कधी अन्नपूर्णा रुपी स्वामी खर्या अर्थाने ही समर्थवाडी पाहून मन प्रसन्न झाले.
Admission Procedure and Rules at Guru Panchayatan – गुरू पंचायतन येथील प्रवेश प्रक्रिया आणी नियम

To inculcate the sattvic spirit at the Guru Panchayatan, it is mandatory for men to dress up in sadra lenga, dhotar or lungi and shela and for women saree is compulsory. You can get information about Guru Panchayatan by registering your personal details in the office here. To enter the main temple premises you have to pay an entrance fee of Rs 125 to 150 per person. By showing this receipt, you can come to darshan daily for up to 15 days to a month. In this Mahaprasad i.e. free food is provided between 12 and 2.

गुरू पंचायतन येथे सात्विक भावना जागृत होण्यासाठी, पुरुषांना सदरा लेंगा, धोतर किव्वा लुंगी आणि शेला तसेच स्त्रियांना साडी असा वेष परिधान करणे अनिवार्य आहे. येथील कार्यालयात आपल्या जवळील वैयक्तिक माहिती नोंदवून आपण गुरू पंचायतन याबद्दल माहिती मिळवू शकता. मुख्य मंदिर परिसरात जाण्यासाठी आपणास 125 ते 150 रुपये प्रती व्यक्ती प्रवेश शुल्क द्यावे लागेल. याची पावती दाखवून तुम्ही तब्बल 15 दिवस पर्यंत ते महिना रोज दर्शनाला येऊ शकता. यातच 12 ते 2 दरम्यान महाप्रसाद म्हणजेच जेवणाची मोफत सोय करण्यात येते.

Tips and things to do at Guru panchayatan Samarth wadi

- Best place for spirituality
- Free food available timing 12 pm to 2 pm
- Sightseeing = 5 nos of Guru temple, 16 Datta temple, Maruti temple, Gomata temple, Amal nagri aani dev nagari
- Timing = 8 am to 5:30 pm
- Entry fees = 125 ₹/ person which valid for 15 days.
- Accommodation = is available only for members. You can find good as well as budget hotel near Neral.
- Contact details of Gurupanchayatan Tel number = 8698794552 / 8805519666 official website = https://www.gurupanchayatan.com

How to reach or get Guru panchayatan Samarth wadi ? – गुरू पंचायतन समर्थ वाडी येथे कसे पोहोचाल ?
The easiest way to reaching here is by rail, the station being Bangani after Badlapur on the Karjat line of the Central Railway. From Wangani station east outside the station you can get rickshaws which are called Samarthwadi and can reach Guru Panchayat Samarth wadi in just 10 to 15 minutes.
येथे पोहोचण्यासाठी सर्वात सोपे माध्यम म्हणजे रेल्वे, मध्य रेल्वेच्या कर्जत मार्गावर बदलापूर नंतर वांगणी हे स्थानक आहे. वांगणी स्थानकावरून पूर्वेला स्थानकाबाहेर तुम्हाला रिक्षा मिळू शकतील ज्यांना समर्थवाडी असे सांगितल्यावर अवघ्या 10 ते 15 मिनिटात गुरू पंचायतन समर्थ वाडी पोहोचू शकता.
While coming by road you are on Badlapur Karjat road if you are going via Mumbai then after Badlapur and if you are coming via Karjat Neral is giving map link to make it easy for you between Badlapur. Click on that to set the map.
रस्ता मार्गाने येताना आपणास बदलापूर कर्जत रोड वर जर तुम्ही मुंबई मार्गे जात असाल तर बदलापूर नंतर आणी कर्जत मार्गे येत असाल तर नेरळ बदलापूर दरम्यान तुम्हास सोपे करून देण्यासाठी map link देत आहे. ज्यावर क्लिक करून map सेट करा.
Guru Panchayatan Sansthan Samarth Wadi Distance between nearby city’s click on map link
- Vangani Railway station = 4.3 Km
- Mumbai to Guru Panchayat Samarth Wadi Distance = 62 Km
- Pune = 127 Km
- Thane = 47 Km
- Satara = 229 Km
- Kolhapur = 349 Km
- Panjim = 546 Km
- Address of Guru Panchayatan = Badlapur Rd, Amalnagari, Goregaon, Maharashtra 421503
Nearby places to visit Click on image for more details




Leave a Reply