Jyotiba temple travel guide tips – ज्योतिबा मंदिर संपूर्ण माहिती


Hello guys, welcome to Jyotiba temple travel guide tips in this section. we are going to visit the temple of Jyotiba meaning king of Deccan, Jyotiba origin, avatar story, jotiba mandir, history, festivals , travel, mountains, Shinde empire, architecture, Gulal, Ambabai and Jyotiba, how to reach, Wadi Ratnagiri, Things to see, Tips, We will bring complete information like links, photos, locality in Marathi and English languages. Shri Jyotiba Devasthan, Jyotiba Dongar, Kolhapur, Maharashtra 416001 India.

Address Shri Jyotiba Devasthan, Jyotiba Dongar, Kolhapur, Maharashtra 416001 India.

नमस्कार मंडळी, Jyotiba travel guide tips या भागात आज आपण ज्योतिबा म्हणजे दख्खनचा राजा या मंदिरास भेट देणार आहोत, जोतिबा उत्पत्ती, अवतार कथा, इतिहास, येथील उत्सव, यात्रा, डोंगर, शिंदे राजघराणे, वास्तुकला, गुलाल, अंबाबाई आणी जोतिबा, येथे कसे पोहोचाल, वाडी रत्नागिरी,  पाहण्यासारख्या गोष्टी, टिप्स, लिंक्स, फोटो, परिसर अशी संपूर्ण माहिती मराठी आणी English भाषांमधून आपणासमोर आणणार आहोत. श्री ज्योतिबा देवस्थान, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००१ भारत.

Jyotiba temple travel guide information

Idol of Shri Jyotiba – श्री ज्योतीबा यांची मूर्ती दर्शन

Shree Jyotiba story and Temple history – श्री ज्योतिबाची कथा आणि मंदिराचा इतिहास, उत्पत्ति

श्री ज्योतिबाची कथा आणि मंदिराचा इतिहास, उत्पत्ति

Jyotiba is the incarnation of Jyoti Bhaskar, Brahma, Vishnu, Mahesh and Jamadagni Rishi in the radiant form of Surya to protect public welfare and religion. Here the initial Jyoti refers to the Jyotirlinga. According to a legend, Jotiba is considered to be an incarnation of Kedarnath Jyotirlinga.  Kedarnath appeared at the call of Ambabai (Mahalaxmi) of Kolhapur. He killed the demon Ratnasur. Later, for the protection of the goddess, he always lived on the Deccan plateau near the city of Kolhapur. Hence this mountain is called Jyotiba’s mountain or Wadi Ratnagiri. It was bordered from the Eastern Ghats to the Western Ghats which earlier came to be known as Southern Land and later Deccan. As the ruler of this territory, the god Jotiba is referred to as the king of the Deccan. Other names of Dev Jotiba are Rawalnath, Kedarnath

Enterence of Jyotiba Temple – दख्खन चा राजा ज्योतिबा

ज्योतिबा मध्ये ज्योति भास्कर, ब्रह्मा विष्णू महेश आणी जमदग्नी ऋषी यांनी सूर्याच्या तेजस्वी रुपात जनकल्याण आणी धर्म रक्षण करण्यासाठी घेतलेला अवतार आहे. येथे सुरुवातीचा ज्योती हा ज्योतिर्लिंगाला सूचित करतो. एका आख्यायिकेनुसार जोतिबा हा केदारनाथ या ज्योतिर्लिंगा चा अवतार मानला जातो. जो कोल्हापूरची अंबाबाई यांच्या हाकेला धावून प्रत्यक्ष केदारनाथ कोल्हापूर येथे प्रकट झाले. त्यांनी रत्नासुर नामक राक्षसाचा वध केला. पुढे देवीच्या रक्षणासाठी सदैव त्यांनी कोल्हापूर नगरी जवळील दख्खनच्या पठारावर वास्तव्य केले. त्यामुळे या डोंगराला ज्योतिबाचा डोंगर किंवा वाडी रत्नागिरी असे संबोधले जाते. ज्याची सीमा पूर्व घाटापासून पश्चिम घाटापर्यंत होती ज्याला पूर्वी दक्षिण भूभाग आणी कालांतराने दख्खन असे नाव पडले. या भूभागाचा अधिपती म्हणून देव जोतिबा यांना दख्खनचा राजा असे संबोधले जाते. देव जोतिबा यांची इतर नावे पुढीलप्रमाणे रवळनाथ, केदारनाथ,

Kedarnath Jyotirlinga – केदारनाथ ज्योतिर्लिंग

Relationship between Ambabai Mahalakshmi and Jyotiba of Kolhapur – कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आणी जोतिबा यांचं नातं –

Step of Jyotiba Temple

 Incarnation story – अवतार कथा

Ambabai of Kolhapur is Goddess Mahalakshmi, according to the Puranas during the churning of the sea, many jewels were acquired from Amrit Kalash and incomparable powers. From which Goddess Mahalakshmi appeared. Shivashankar averted a great calamity by consuming the halal (poison) created at that time. After this incident, Goddess Mahalakshmi performed a severe penance on Lord Shiva Shankar to get the desired boon i.e. marriage with Lord Vishnu. Due to which she got married to Lord Vishnu. Later, when Ratnasura invaded the plateau of Kolhapur and Deccan. At that time once again Devi Ambabai invoked the adorable deity Shiv Shankar i.e. Kedarnath with devotion, this time Lord Shankar appeared in the form of Jyotiba and killed Ratnasura.

Full view of Shree Jyotiba temple Kolhapur

कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे साक्षात देवी महालक्ष्मी, पुराणानुसार समुद्रमंथनादरम्यान अनेक रत्ने अमृत कलश आणि अतुलनीय शक्ती संपादित केल्या गेल्या. ज्यामधून माता महालक्ष्मी प्रकट झाली. त्यावेळी निर्माण झालेल्या हलाहल (विष) हे शिवशंकराने प्राशन करून मोठा अनर्थ टाळला. या प्रसंगा नंतर माता महालक्ष्मी ने इच्छित वरप्राप्तीसाठी म्हणजेच भगवान विष्णु सोबत विवाह व्हावा यासाठी भगवान शिव शंकराची कठीण तपस्या केली. ज्यामुळे त्यांचा विवाह भगवान विष्णूंशी झाला. या पुढे जेव्हा कोल्हापूर आणि दख्खनच्या पठारावर रत्नासुराने उच्छाद मांडला. त्यावेळी पुन्हा एकदा देवी अंबाबाईने भक्तिभावाने आराध्य दैवत असलेल्या शिवशंकर म्हणजेच केदारनाथ यांचे आवाहन केले यावेळी भगवान शंकराने ज्योतिबा रुपात प्रकट होऊन रत्नासुराचा वध केला.

Shinde empire and Jyotiba temple – शिंदे (सिंधिया) राजघराणे आणि ज्योतिबा

Scindia trust at Jyotiba Temple – शिंदे देवस्थान ट्रस्ट जोतिबा मंदिर कोल्हापूर

History of Jyotiba Temple – इतिहास

The Shinde clan originally emerged in the Satara district. At that time it was the golden age of Maratha Empire Peshwai. Bajirao Peshwa had conquered many states of Maharashtra with his prowess. Ranoji Shinde, Malharrao Holkar showed great bravery in this feat, so Ranoji Shinde’s family got the chiefdom of Madhya Pradesh state with Ujjain and Gwalior as the capital of their empire. Shinde is called Scindia in the dialect of Madhya Pradesh. Maharaj Ranaji Shinde of Madhya Pradesh established the Jyotiba temple. The Jotiba temple still stands as a fine example of beautiful stonework and Marathi Vastu art of that time and Jyotiraditya Scindia, a scion of the Shinde family, contributes to the upkeep of the temple and its annachhatra. Thus the Shinde family and the Jotiba temple have a very close relationship.

शिंदे घराणे हे मूळतः सातारा जिल्ह्यात उदयास आले. त्यावेळी पेशवाईतला सुवर्ण काळ होता. बाजीराव पेशवे यांनी महाराष्ट्रातील अनेक राज्य आपल्या पराक्रमाने जिंकून घेतली होती. या पराक्रमात राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर यांनी फार मोठे शौर्य गाजवले, त्यामुळे राणोजी शिंदे यांच्या घराण्याला मध्यप्रदेश राज्याची सरदारकी मिळाली उज्जैन आणी ग्वाल्हेर येथे त्यांच्या साम्राज्याची राजधानी आहे. मध्य प्रदेश येथील बोली भाषेत शिंदे यांना सिंधिया असे म्हंटले जाते. मध्यप्रदेश चे महाराज राणाजी शिंदे यांनी ज्योतिबा मंदिराची प्रतिष्ठापना केली. सुंदर अशा दगडी बांधकामाचे आणि त्या वेळच्या मराठी वास्तु कलेचे उत्तम उदाहरण म्हणून जोतिबा मंदिर आजही दिमाखात उभे आहे आणि शिंदे घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया आजही या मंदिराच्या देखभालीसाठी आणी अन्नछत्रासाठी हातभार लावतात. अशाप्रकारे शिंदे घराणे आणि जोतिबा मंदिर यांचे फार जवळचे नाते आहे.

Jyotiba Temple visit experience

Jotiba Temple is situated on a peak of Sahyadri in Kolhapur which is called as Jotiba Cha Dongar. This place is located between Ratnagiri and Kolhapur district, very close to Panhala fort. It is called Wadi Ratnagiri. Jyotiba temple is situated on a plateau after leaving the hill of Jyotiba. From the parking lot, you can walk down to the temple. After going down the stairs, the first thing we see is the temple of Kalbhairav and Lord Shani. Kalabhairava is considered as Jyotiba’s bodyguard. So we can move forward only by seeing them. The entire temple is built in black stone. Lamps outside, small cisterns for water. Such construction has been done. After seeing the deities of Goddess Mahalakshmi and Goddess Yamai, one can enter the main gabhara.

Advertisements

जोतिबा मंदिर हे कोल्हापूर येथील सह्याद्रीच्या एका शिखरावर स्थापित आहे ज्याला जोतिबा चा डोंगर असे म्हंटले जाते. पन्हाळा किल्ल्यापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यादरम्यान आहे. याला वाडी Ratnagiri ही संबोधले जाते. ज्योतिबाचा डोंगर सोडून गेल्यानंतर एका पठारावर ज्योतिबा मंदिर वसलेले आहे. पार्किंग पासून थोडे खालील बाजूस चालून आपल्याला मंदिराकडे जाता येते. पायऱ्यातून खाली गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काळभैरव आणि शनि देवाचे मंदिर दृष्टीस पडते. काळभैरवांना ज्योतिबाचे अंगरक्षक मानले जाते. त्यामुळे त्यांचे दर्शन घेऊनच आपल्याला पुढे जाता येते. संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात बनवले आहे. बाहेरील बाजूस दीपमाळ, पाण्यासाठी छोटे हौद. अशी उभारणी केली आहे. देवी महालक्ष्मी, देवी यमाई या देवतांचे दर्शन घेऊन पुढे मुख्य गाभारत प्रवेश करता येतो.

Things to See near jotiba temple and photos – जोतिबा मंदिराजवळ पाहण्यासारख्या गोष्टी

An idol of Jotiba, wearing a turban like that of a Maratha chieftain, is seen sitting in front of it. All the weapons of Shiva Shankar, the remaining serpents, and the leaf pot, such a bright form comes before the eyes. This form means that one of us possesses incomparable powers. And He always lives with us in some form. Millions of salutations to this god. On one side of the main door, there is a large space available for food chhattis and charity. Where food is often donated by Shinde’s family.

समोरच जोतिबा ची मराठमोळ्या सरदारा सारखी पगडी धारण केलेली मूर्ती बसलेली मूर्ती दृष्टीस पडते. शिव शंकराची सर्व अस्त्रे शस्त्रे, शेष नाग, आणी पानाचे भांडे, अशे आगळे रूप डोळ्यासमोर येते. हे रूप म्हणजे आपल्यातील कोणी अतुलनीय शक्तींचा मालक आहे. आणी तो सदैव कुठल्या तरी रुपात आपल्या सोबत वास करीत असतो. अश्या या दैवताला कोटी कोटी प्रणाम. मुख्य दरवाज्याच्या एका बाजूस अन्नछत्र आणी दान धर्मासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. जेथे शिंदे यांच्या घराण्याद्वारे बरेचदा अन्नदान केले जाते.

Celebrations and Yatras at Jyotiba Temple – ज्योतिबा मंदिरातील उत्सव आणी यात्रा

As God Jotiba is the symbol of the sun, his birthday is celebrated on Sunday. A large fair is held on Chaitra Poornimas and many devotees from neighboring states visit here. Here is Palkhi Pradakshina and the practice of swinging the palanquin along with swinging sticks decorated according to the respectful position of the 96 dynastic.

देव जोतिबा सूर्याचे प्रतीक असल्याने यांचा वाढदिवस रविवार मनाला जातो. चैत्र पौर्णिमेस येथे मोठी जत्रा भरते शेजारील राज्यातून अनेक भाविक येथे भेट देतात. येथे पालखी प्रदक्षिणा आणी 96 घराण्याच्या माना नुसार सजवलेल्या काठ्या झुलवत पालखी सोबत फिरवण्याची पद्धत आहे.

Khandoba and Jotiba Turmeric and Gulal Interrelation – खंडोबा आणी जोतिबा हळद आणी गुलाल परस्पर संबंध

We all know that God’s avatars are taken for certain tasks. Similarly, God Khandoba of Jejuri and God Jotiba of Kolhapur are two incarnations of Lord Shiva Shankar. The main thing is that Lord Shankar can carry only white flowers. But their incarnations are given to Khanderaya of Jejuri as a store of turmeric and to Jotiba of Kolhapur as gulal. Given the logical reason for this. These Gods who are dyed in the devotion of the devotees must be spreading this particular color all around. So that everyone can understand the positions of these incarnated deities during the sky journey, the purpose of the splashing of these colors should be. And both these avatars were closer to the devotees like Pandurang of Pandharpur so they were colored in the color of the devotees.

आपणा सर्वास माहिती आहे देवाचे अवतार हे ठराविक कार्यासाठी घेतलेले असतात. त्याच प्रमाणे जेजुरी चा देव खंडोबा आणी कोल्हापूर चा देव जोतिबा ही भगवान शिवशंकर यांची दोन अवतार रूपे. मुख्य म्हणजे भगवान शंकराला फक्त पांढरे फूल वाहता येते. पण त्यांचे अवतार जेजुरीच्या खंडेरायाला हळदीचा भंडारा आणी कोल्हापूर च्या जोतिबा ला गुलाल उधळला जातो. याचे तार्किक कारण पाहता. भक्तांच्या भक्तिरसात रंगणारे हे देव या ठराविक रंगाची उधळण सभोवताली करीत असावेत. ज्यामुळे आकाश गमनादरम्यान सर्वाना या अवतारी देवतांची स्थाने समजून यावीत हा या रंगांच्या उधळण्याचा हेतू असावा. आणि हे दोन्हीही अवतार पंढरपूरच्या पांडुरंग प्रमाणे भक्तांच्या जास्त जवळचे होते त्यामुळे ते भक्तांच्या रंगात रंगून गेले.

Tips for Jotiba temple visit

Unlimited food in kolhapur Rs.333/-

How to reach Jotiba temple kolhapur –  jyatiba जोतिबा मंदिर येथे कसे पोहोचायचे

To reach Jotiba temple first one has to come to Kolhapur, Jotiba distance from Kolhapur bus station is 21 km. It takes about 30 minutes to cross. There are many options available to go here like state government buses, private cars, autos.

जोतिबा मंदिरात जाण्यासाठी प्रथम कोल्हापुरात यावे लागेल, कोल्हापूर बसस्थानक येथून जोतिबा अंतर 21 km चे आहे. जे पार करण्यास साधारण 30 मिनिटांचे अंतर पार करावे लागते. येथे जाण्यासाठी राज्यशासनाच्या बसेस, private कार, ऑटो असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

Nearby places to visit near Jyotiba temple

Categories: HOLY PLACES, Tourist places

1 comment

  1. 👌👌👌👌

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: