Mahalaxmi temple yatra harali travel guide tips – महालक्ष्मी जत्रोत्सव यात्रा हरळी


Hello congregation. Mahalaxmi temple yatra harali travel guide tips In this area we are going to visit village Harali in Gadhinglaj taluka of Kolhapur district. Here we are presenting complete information about Mahalakshmi Devi Yatra, Kal Bhairav and Subak Temples, how to reach here, actual experience of festivals, idols, palanquins, traditions, processions. Address Harli Budruk, Taluka Gadhinglaj District Kolhapur, Maharashtra, India.

नमस्कार मंडळी. Mahalaxmi temple yatra harali travel guide tips या भागात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हरळी या गावी भेट देणार आहोत. येथील महालक्ष्मी देवीची यात्रा, काळ भैरव आणी सुबक मंदिरे, येथे कसे पोहोचायचे, जत्रोत्सव, मूर्ती, पालखी, परंपरा, मिरवणूक यांचा प्रत्यक्ष अनुभव अशी संपूर्ण माहिती आपणा समोर सादर करत आहे. पत्ता हरळी बुद्रुक, तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.

Mahalaxmi temple yatra harali travel guide information

Mahalaxmi yatra in kolhapur district – कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी यात्रा

As we all know Ambabai i.e. Goddess Mahalakshmi of Kolhapur is one of the three and a half Shaktipeeths in Maharashtra and is a world famous Shaktipeeth. That is why there are temples of Goddess Mahalakshmi in various villages of Akhand Kolhapur district. In some villages, they have assumed the form of village deity and clan deity. The yatra or festival of such a goddess is celebrated after a certain period of years. Every five years is ten years to fifteen years. The festival committee decides the date of this yatra. In this, the temple is well illuminated and decorated. The whole village gets involved. The door of every house is illuminated like Diwali. The festival of Devi’s palanquin lasts through the night. Presenting before us the complete description of one such Palkhi festival.

आपणा सर्वांना माहीत असल्याप्रमाणे कोल्हापूरची अंबाबाई म्हणजेच देवी महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक जग प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. त्यामुळेच देवी महालक्ष्मी यांची मंदिरे अखंड कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आहेत. काही गावांमध्ये त्यांना ग्रामदेवता आणि कुलदेवतेचे स्वरूप ही प्राप्त झाले आहे. अशा देवीची यात्रा म्हणजेच उत्सव हा काही ठराविक वर्षाच्या कालखंडानंतर साजरा केला जातो. प्रति पाच वर्षे दहा वर्षांनी पंधरा वर्षे अशा प्रमाणात असतो. या यात्रेची तारीख ही उत्सव समिती ठरवते. यामध्ये मंदिरास उत्तम रोषणाई आणि सजावट केली जाते. संपूर्ण गाव यात सामील होतो. प्रत्येक घराच्या दारावर दिवाळीप्रमाणे रोषणाई केली जाते. देवीच्या पालखीचा उत्सव रात्रभर चालतो. अशा एका पालखी उत्सवाचं संपूर्ण वर्णन आपल्यासमोर सादर करत आहे.

Personal Experience visit to Harali village in Gadhinglaj

आम्हाला आमंत्रित करणारे श्री जाधव

Just as one invites the near and dear ones to the festival of Diwali, those who have a fair in their village invite their near and dear ones. Due to such an invitation we reached Harli village and enjoyed its temples, yatras and fairs. First we visited various temples in the village. Chief among them are Shree Maruti Temple, Shree Ganapati Temple, Kalabhairav Temple and Shree Mahalakshmi Temple. Out of these, Kalabhairav Temple and Mahalakshmi Temple were somewhat different in their maintenance and appearance.

दिवाळी सणाला जसा पण निकटवर्ती यांना आमंत्रण देतो त्याचप्रमाणे ज्यांच्या गावी जत्रा असते ते निकटवर्तीय आणि नातेवाईकांना आग्रहाचे निमंत्रण देतात. अशाच निमंत्रणामुळे आम्ही हरळी गावात पोहोचलो आणी तेथील मंदिरे, यात्रा आणी जत्रोत्सव याचा आनंद अनुभवला. प्रथम आम्ही गावातील विविध मंदिरात भेट दिली. ज्यामध्ये प्रमुखाने श्री मारुती मंदिर, श्री गणपती मंदिर, हे कालभैरव मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर. यापैकी काळभैरव मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर यांचा रखरखाव आणि थाट काही वेगळाच होता.

Temples in Harli village Gadhingalaj Kolhapur – हरळी गावातील मंदिरे गडहिंग्लज कोल्हापूर

Kalbhairav Temple in Harli village kolhapur – कोल्हापुरातील हरळी येथील कालभैरव मंदिर

Kalbhairava is the bodyguard of Shiva Shankar as well as Jyotiba. Shri Kalbhairava has the power to take the first steps in the face of adversity with his great strength and strength. So it is believed that wherever Sri Kalabhairav will be. No visible or malignant forces enter there. And even if such forces enter, the people are protected by Sri Kalabhairava by resisting them. Similarly, Sri Kalbhairav Temple has been established near the entrance to Harli village.

श्री कालभैरव मंदिर

कालभैरव म्हणजे शिवशंकर तसेच ज्योतिबा यांचे अंगरक्षक समोरील येणाऱ्या संकटांना आपल्या प्रचंड बाहुबली आणि सामर्थ्याने प्रथम लावण्याचे सामर्थ्य हे श्री कालभैरवामध्ये आहे. त्यामुळे अशी मान्यता आहे की जिथे श्री काळभैरव असतील. तेथे दृष्ट किंवा घातक शक्ती प्रवेश करत नाहीत. आणि अशा शक्तीने प्रवेश जरी केला त्यांचा प्रतिकार करून जनतेचे रक्षण श्री कालभैरवाद्वारे केले जाते. त्याचप्रमाणे हरळी गावात प्रवेश द्वारा जवळ श्री कालभैरव मंदिर स्थापित केले आहे.

Advertisements

Shree Mahalakshmi Temple Harli – श्री महालक्ष्मी मंदिर हरळी

Adjacent to the main road on the left side is the grand temple of village deity Sri Mahalakshmi of Harli village. These were also the festival idols of today’s festival. The festival here is called Lakshmi of Harli village. Let’s visit this temple first.

श्री महालक्ष्मी देवी हरळी गाव

मुख्य रस्त्याला लागूनच डाव्या बाजूला हरळी गावातील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यांचे भव्य मंदिर आहे. या आजच्या उत्सवातील उत्सव मूर्तीही होत्या. येथील उत्सवाला हरळी गावातील लक्ष्मी असे ही संबोधले जाते. चला तर प्राथम या मंदिरास भेट देऊ.

Harli village fair and Yatra management – हरळी गावातील जत्रोत्सव आणी यात्रा व्यवस्थापन

We were amazed to see the Yatra management in this village. Some rules were followed along with decoration, lighting, colors. The main thing is the cleanliness of the palanquin procession route, the rangolis made on it were ready for the reception and the entire villages were banned from vehicles since almost a week before the festival. As a result, the entire roads seemed to be ready for pilgrimage. This may have been possible due to the unity and better management of the village.

या गावातील यात्रेचे व्यवस्थापन पाहून आम्ही थक्क झालो. सजावट, रोषणाई, रंगरंगोटी सोबत काही नियम ही पाळण्यात गेले होते. मुख्य म्हणजे पालखी मिरवणुकीच्या मार्गावरील स्वच्छता, त्यावर बनवलेल्या रांगोळ्या स्वागतासाठी तयार होत्याच त्यासोबत संपूर्ण गावांमध्ये उत्सवाच्या तब्बल एक आठवडे अगोदर पासून वाहन बंदी करण्यात आले होती. ज्यामुळे संपूर्ण रस्ते हे मोकळे यांनी यात्रेसाठी सुसज्ज वाटत होते. हे म्हणजे गावातील एकी आणी उत्तम व्यवस्थापन यामुळे शक्य झाले असावे.

Traditions and Processional Ceremonies – परंपरा आणी मिरवणूक सोहळा

Now began the spectacular celebration we had been waiting for. According to tradition, in some villages the procession takes place in a palanquin or a chariot. But the Hatavar Lakshmi tradition of this Harli village is famous. Devotees carry the octagonal idol of the goddess on their shoulders. They make a spectacular procession of the goddess swinging and dancing along the fixed paths to the beat of drums. From a distance, it looks like the actual Jagdamba Ambabai is marching along ready for battle.

आता आम्ही वाट पाहत होतो तो नेत्रदीपक उत्सव सुरू झाला. परंपरेनुसार काही गावांमध्ये पालखी किंवा रथातून मिरवणूक निघते. पण या हरळी गावातील हातावरची लक्ष्मी परंपरा प्रसिद्ध आहे. देवीची अष्टभुजा मूर्ती भाविक आपल्या हातावर खांद्यावर घेऊन. ढोल ताशांच्या गजरात जागोजागी ठरलेल्या मार्गांवरून झुलवत नाचत देवीची लक्षवेधी मिरवणूक काढतात. दुरुन पाहता प्रत्यक्ष जगदंबा अंबाबाई लढाईसाठी सज्ज होऊन मार्गक्रमण करत आहे असं भासते.

Nearby places to visit near Jyotiba temple

A very happy atmosphere and excitement is visible in everyone’s eyes. The accompanying burst of firecrackers and bursting of gulal paints the entire sky with its colors. This journey continues till the morning of the next day. All the villagers and their relatives on both sides of the road enjoy the festival throughout the night.

अगदी आनंदी वातावरण आणी जल्लोष प्रत्येकाच्या डोळ्यात दिसून येतो. सोबत होणारी फटाक्यांची आतिषबाजी आणी गुलालाची उधळण ही, संपूर्ण आसमंत आपल्या रंगात रंगवून टाकते. अशी ही यात्रा दुसर्‍या दिवशी पहाटे पर्यंत सुरू राहते. सर्व ग्रामस्थ आणी त्यांचे नातलग रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रभर उत्सवाचा आनंद घेतात.

Tips and Uniqueness of Laxmi yatra harli

  • Lakshmi Yatra at Harli is held every seven years
  • हरळी येथील लक्ष्मी यात्रा ही दर सात वर्षांनी असते
  • यात्रेची तारीख आणी नियोजन ही उत्सव समिती ठरवते.
  • येथे पोहोचण्यासाठी गडहिंग्लज तसेच आजरा ही तालुक्याची ठिकाणे आहेत.
  • यात्रा सोडून इतर दिवशी तुम्ही येथील मंदिरांना भेट देऊ शकता.
  • मिरवणूक ही संध्याकाळी सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालते.
  • गावातील मान्यवर व्यक्तींच्या दारासमोर ही पालखी नेली जाते.

How to reach harli village – travel guide

Categories: HOLY PLACES, Tourist places, UNKNOWN PLACES

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: