Om Ganesh temple Mahagaon travel guide tips – ओम गणेश गणपती महागाव


Hello people, In this article Shree om Ganesh temple Mahagav we are going to visit the Mahagav Ganesh temple in Gadhinglaj taluka which is famous as Lord Ganesha temple in the lake. Here we are presenting the complete information along with our actual experience about the architecture, the surrounding nature, how to reach here, things to see on the way to Kolhapur Amboli – sawantwadi route. Address Mahagaon, Taluka Gadhinglaj, District Kolhapur, Maharashtra.

नमस्कार मंडळी, Shree om Ganesh temple Mahagav या लेखामधे आपण तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध अशा गडहिंग्लज तालुक्यातील महागाव गणेश मंदिराला भेट देणार आहोत. येथील वास्तू रचना, सभोवतालचा निसर्ग, येथे कसे पोहोचायचे, कोल्हापूर आंबोली – सावंतवाडी दरम्यान पाहण्यासारख्या गोष्टी , अशाप्रकारे संपूर्ण माहिती आमच्या प्रत्यक्ष अनुभवा सोबत आपल्यासमोर मांडत आहोत. पत्ता महागाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.

Om Ganesh temple Mahagaon travel guide – ओम गणेश मंदिर महागाव तळ्यातला गणपती

Traveling i.e. travel is a topic that some people find enjoyable and some people find it very boring or annoying. The real reason is that we don’t just enjoy traveling. Now some people think that travel and happiness are the same thing. We can make our journey enjoyable by using some tricks. The best trick for this is the milestones in the journey. Split your journey into two or more stages rather than traveling continuously. Visit various important known or lesser known locations that come your way. There, enjoy the natural beauty, vastu special food and continue the journey. This will add color and fun to the journey. Similarly, there are many beautiful places on the road going to Konkan via – Kolhapur. One of them is Om Ganesh Mandir Mahagav.

Mahagaon on the way to Kolhapur Konkan route

ट्रॅव्हलिंग म्हणजेच प्रवास हा विषय काही जणांना आनंददायी तर काही जणांना फार बोरिंग किव्वा त्रासदायक वाटतो. याचं खरं कारण पाहता आपण केवळ प्रवास करतो त्याचा आनंद घेत नाही. आता कोणाला तरी वाटेल प्रवास आणि आनंद काहीतरीच काय. काही युक्त्या वापरून आपण आपला प्रवास आनंददाई करू शकतो. यात सर्वोत्तम युक्ती म्हणजे प्रवासातील टप्पे. सतत प्रवास करण्यापेक्षा आपल्या प्रवासाचे दोन किंवा अधिक टप्प्यांमध्ये विभाजन करा. आपल्या मार्गावर येणाऱ्या विविध महत्त्वाच्या माहित किंवा कमी माहीत असलेल्या स्थानाची भेट घ्या. तेथील, निसर्ग सौंदर्य, वास्तु विशेष खाद्य पदार्थ याचा आनंद घेत प्रवास सुरू ठेवा. यामुळे प्रवासाची रंगत आणी गम्मत vadhavta येईल. अश्याच मुंबई वरून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणार्‍या रस्त्यावर अनेक सुंदर स्थळे आहेत. त्यापैकी एक ओम गणेश मंदिर महागाव.

Om Ganesh temple Mahagav in the lake – ओम गणेश मंदिर महागाव तळ्यातला गणपती

This temple is established on the road Amboli Ghat via Kolhapur Gadhinglaj. The special thing about this temple is that it is built in the middle of Ka lake. Hearing water on all sides and Ganesha temple in the middle feels a little different. But really this is a great example of the ingenuity of the villagers of this village. That is why this temple is called as Ganpati in the lake

कोल्हापूर गडहिंग्लज मार्गे आंबोली घाट या रस्त्यावर हे मंदिर स्थापित आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे हे का तलावाच्या मध्यभागी बांधले गेले आहे. चारही बाजूने पाणी आणि मधोमध असलेले गणेश मंदिर ऐकून थोडे वेगळे वाटते. पण खरंच येथील गावातील गावकर्‍यांच्‍या कल्पकतेचे हे उत्तम उदाहरण आहे. म्हणुनच या मंदिराला तळ्यातल्या गणपती असे ही संबोधले जाते.

Advertisements

Om Ganesh Mandir Mahagav experience – ओम गणेश मंदिर महागाव प्रत्यक्ष अनुभव

We had the opportunity to visit this temple courtesy of our friend Mr. Sopan Vaskar. Coming from Gadhinglaj to Ajra, this temple is situated in a pond just two minutes from the main road in Mahagao village. We entered through the arch of the temple. After climbing a few steps, a small bridge leading to the main temple came into view. As soon as we reached that bridge, we were very happy to see such a beautiful panoramic view. Beautiful clear water on all sides and the temple in between is very amazing. A fountain was also installed in the neighboring pond. Think how beautiful this temple of fountains and water will look in the night light.

आमचे स्नेही श्री सोपान वासकर यांच्या सौजन्याने या मंदिरात भेट देण्याचा योग आला. गडहिंग्लज येथून आजरा येथे येताना महागाव या गावी मुख्य रस्त्यापासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर एका तलावात हे मंदिर स्थापित आहे. मंदिराच्या कमानीतून आम्ही आत प्रवेश केला. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात घेऊन जाणारा एक छोटासा पूल दृष्टीस पडला. त्या पुलावर पोहोचताच सुंदर असे विहंगम दृश्य पाहून फार आनंद झाला. सर्व बाजूस सुंदर नितळ पाणी आणी मधील मंदिर फारच अप्रतिम. सोबत शेजारी शेजारील तलावात कारंजे बसवले होते. विचार करा रात्रीच्या रोषणाईत कारंजे आणी पाण्यातील हे मंदिर किती छान दिसत असेल.

Architecture of Om Ganesha Temple Mahagav – ओम गणेश मंदिर महागाव मंदिराची वास्तू रचना

Despite being a small temple, it has a very amazing and charming architectural structure. What is special is that a very beautiful temple has been built in such a small space with the help of creativity. The dome of the temple stands on eight pillars. The door of the main temple is teak wood with fine carvings. A circumambulation path has been made between the pillars and gabhara of the temple. On the octagonal walls of the temple, idols of the famous Ashtavinayaka are installed in his name. Mooshak Raj and Kurma are sitting in front.

एक छोटेखानी मंदिर असूनही फार अप्रतिम आणी मनमोहक वास्तू रचना आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी जागेत कल्पकतेच्या जोरावर फार सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचा घुमट हा आठ खांबांवर उभा आहे. मुख्य मंदिराचा दरवाजा हा सागवानी असून त्यावर उत्तम कोरीवकाम केले आहे. मंदिराचे खांब आणी गाभारा यामधे प्रदक्षिणा मार्ग ही बनवण्यात आला आहे. मंदिराच्या अष्टकोनी भिंतींवर सुप्रसिद्ध अष्टविनायक यांच्या मूर्ती त्यांच्या नावा बसवल्या आहेत. समोरच मूषक राज आणि कूर्म विराजमान आहेत. गाभाऱ्याच्या आत सुंदर अशी पाषाणापासून बनवलेली सुंदर अशी गणेश मूर्ती आहे. व तिच्या समोरच अभिषेक आधी पूजा विधींसाठी पितळेची अजून एक मूर्ती आहे. ज्यावर पुजाऱ्यांद्वारे नित्य अभिषेक केला जातो.

Om Ganesh Mandir Mahagav festival celibaration – 🕉 गणेश मंदिर महागाव साजरे होणारे उत्सव

माघी गणेश, गणेश चतुर्थी, अंगारक संकष्ट चतुर्थी यादिवशी भक्त मंडळी अवश्य भेट देतात.

Tips

  • Video available on youtube by DR. YOGRAJ V. RAOTE click on below link = https://youtu.be/lg03sPcDaVU
  • Devotees must visit on Maghi Ganesha, Ganesh Chaturthi, Angarak Sankashta Chaturthi.

How to reach Mahagav Ganpati temple kolhapur

Nearby places to visit

Categories: HOLY PLACES, Tourist places, UNKNOWN PLACES

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: