Swami samarth math bhuigaon travel guide tips – श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव संपूर्ण माहिती


Hello everyone, today we are going to visit Swami Samarth Math near Vasai Bhuigaon in this article Swami Samarth Math Bhuigaon Travel Guide. In this article you will find complete information about Matha, photos, architectural design, activities, Matha timings, festivals, how to reach here, tips, visit experience, amazing idol of Sri Swami Samarth, things to do, temple premises, all information in Marathi and English languages. Which you can use like a travel guide. Taluka Vasai, District Palghar, Maharashtra, India.

नमस्कार मंडळी आज आपण Swami samarth math bhuigaon travel guide या लेखात, वसई भुईगाव जवळील स्वामी समर्थ मठाला भेट देणार आहोत. या लेखामध्ये आपणास मठा बद्दलची संपूर्ण माहिती, वास्तू रचना, उपक्रम, मठाची वेळ, उत्सव, येथे कसे पोहोचावे, टिप्स, प्रत्यक्ष भेटी दरम्यानचा अनुभव, अप्रतिम श्री स्वामी समर्थांची मूर्ती, ईतर पाहण्यालायक गोष्ठी, मंदिर परिसर, याबद्दल सर्व माहिती मराठी आणी इंग्रजी या भाषांमधून आपणासमोर मांडत आहे. ज्याचा उपयोग आपणास travel guide सारखा करता येईल. तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र, भारत.

Special thanks to Ms. Supriya ji (Swami samarth math bhuigaon) for detail information. तपशीलवार माहितीसाठी सुप्रिया जी यांचे विशेष आभार.

Swami samarth math bhuigaon travel guide

Sri Swami Samarth means the actual incarnation of Sri Dattatreya. His promise as a blessing, “Don’t be afraid” ” Bhiu Nakos Mi tuzya pathishi aah” is still resonates with many devotees even today. That is why he has many followers not only in India but all over the world. We are making the statement from our own experience that even today Swami responds to a call made by a devotee. Swami grace gave us an opportunity to visit the Shree Swami samarth Math at Bhuigaon vasai.

श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय अवतार. त्यांच्या भिऊ नकोस या एका आशिर्वाद रुपी आश्वासन अनेक भाविकांना आजही प्रचिती देऊन जाते. त्यामुळेच त्यांचे अनेक अनुयायी केवळ भरातच न्हवे तर संपूर्ण विश्वात आहेत. भक्ताने आर्ततेने मारलेल्या एका हाकेला स्वामी आजही प्रतिसाद देतात हे विधान आम्ही स्वयं अनुभवातून करत आहे. असे आमचे दैवत गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या भुईगाव येथील मठाला आज भेट देण्याची संधी स्वामी कृपेने मिळाली.

Swami Samarth Math Bhuigaon Establishment, History and Complete Information – स्वामी समर्थ मठ भुईगाव स्थापना, इतिहास आणी संपूर्ण माहिती

A direct vision of Shri Sandeep Mhatre led to the establishment of Shri Swami Samarth Math Bhuigaon. Its History As such, Sri Sandeep Mhatre’s family were Swami devotees from generation to generation. In the presence of his father, Swami Bhakti blossomed in his heart. One night he was given a vision and order by Sri Swami Samartha that a umbar tree was born at the back of his house and he has to build a monastery there. On the second day, when he went to that place, he saw a real Umbra tree, available at the same place. Umbra tree is was dear to Sri Dattatreya. Later, with tireless efforts, the elderly family members and villagers started to build Swami’s sumptuous temple.

श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव स्थापने साठी श्री संदीप म्हात्रे यांना झालेला प्रत्यक्ष दृष्टांत कारणीभूत ठरला. त्याचा इतिहास असा, श्री संदीप म्हात्रे यांचे कुटुंब हे पिढ्यानपिढ्या स्वामी भक्त होते. वडिलांच्या सानिध्यात त्यांच्या मनात स्वामी भक्तीचा अंकुर उमलला. एके रात्री त्यांना श्री स्वामी समर्थानी दृष्टांत दिला, की त्यांच्या घराच्या मागील बाजूस एक उंबराचे झाड जन्माला आले आहे तेथे मठ बांध मी येत आहे. दुसरे दिवशी त्याजागी प्रत्यक्ष जाऊन पाहता तेथे खरोखर उंबराचे म्हणजेच प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांना प्रिय असलेले उंबराचे झाड दृष्टीस पडले. पुढे अथक परिश्रमाने म्हात्रे कुटुंबीय आणी ग्रामस्थांनी स्वामींचा दिमाखदार मठ उभारण्यास सुरवात केली.

Amazing statue of Sri Swami Bhuigaon Math – श्री स्वामी यांची अप्रतिम मूर्ती भुईगाव मठ

Swami samarth math bhuigaon idol photo

You may have seen the idol of Swami at Bhuigaon Vasai on the profile photo or whatsup status of many Swami devotees. At that time, the question in our mind. How such a beautiful idol would be, who made it ? when would we be able to see it ?All questions were solved during the visit to Bhuigaon Math. A famous sculptor from Jaipur has realized the work of bringing to reality the imaginary idol meant by the saying Sri Swami Samarth, the god of the wonderful brilliant infinite crores of universes.

भुईगाव वसई येथील स्वामींची मूर्ती आपण अनेक स्वामी भक्तांच्या प्रोफाईल फोटो किंवा whatsup status वर पाहिली असेल. त्यावेळी एवढी सुंदर मूर्ती कुठली असेल, कोणी घडवली असेल, कधी पाहता येईल का असे प्रश्न मनात येत असत या प्रश्नाचा उलगडा भुईगाव मठ भेटीत झाला. अप्रतिम तेजस्वी अनंत कोटी ब्रम्हांडांचे नायक श्री स्वामी समर्थ या उक्तीनुसार अभिप्रेत असलेली काल्पनिक मूर्ती सत्यात आणण्याचे काम हे जयपूर मधील प्रसिद्ध मूर्तिकार यांनी साकार केले.

Sri Sandeep Mhatre and other followers were of the opinion that it should be the best idol to establish a Swami Math. For that, he visited Rajasthan, which is famous for its marble carvings. Strangely, none of the artisans here knew about Swami’s image. Yet one of them, a skilled craftsman sculptor, was ready to undertake the difficult task. He created this amazing idol by looking at only the photos that were shown. This gave rise to the statement of mantra. Swami, as stated in the verse of the Tarak Mantra, “The Lord who makes the unthinkable, will make it possible, Lord”. ” Ashyaky hi shakya kartil Swami “.

Advertisements

स्वामी मठ स्थापना करण्यासाठी उत्तम मूर्ती असावी अशी श्री संदीप म्हात्रे आणी इतर अनुयायांचे मत होते. त्यासाठी संगमरवराच्या कोरीवकामास प्रसिद्ध अश्या राजस्थान येथे भेट दिली. गम्मत म्हणजे येथील कुठल्याही कारागिरांना स्वामींच्या भावमुद्ररची माहिती न्हवती. तरीही त्यातील एक कुशल कारागीर मूर्तिकार हा कठीण काम करण्यास तयार झाले. केवळ दाखवण्यात आलेल्या फोटो पाहून त्यांनी ही अप्रतिम मुर्ती घडवली. यावरून तारक स्वामींच्या तारक मंत्रातील ओवीत सांगितल्याप्रमाणे “अतर्क्य अवधूत ते स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी” या विधानाची प्रचिती आली.

Swami Samarth Math Bhuigaon Experience – स्वामी समर्थ मठ भुईगाव प्रत्यक्ष भेटीचा अनुभव

We were in search of this wonderful idol of Swami, suddenly Mr. Karan from our office narrated his experience showing Swami’s idol of Bhuigaon. A desire to meet Swami arose in my mind. And our wishes were fulfilled within a week time. Recently visited Swami devotee Shri Prasad Shinde of our Swami family invited us to see Swami’s picture exhibition filled in Vasai. After seeing the picture exhibition, the plan to go to Ghodbunder was suddenly canceled and suddenly it was decided to go to Bhuigaon. At that time, We experienced how Swami fulfills the wishes of his devotees.

स्वामींच्या या अप्रतिम मूर्तीच्या शोधात असलेल्या आम्हाला, अचानक आमच्या कार्यालयातील श्री करण यांनी भुईगावची स्वामींची मूर्ती दाखवत त्यांचा अनुभव कथन केला. मनात स्वामी भेटीची ओढ निर्माण झाली. आणी आमच्या स्वामिनी इच्छा अगदी आठवड्यात पूर्ण केलीआमच्या स्वामी परिवारातील नुकत्याच भेट झालेले स्वामी भक्त श्री प्रसाद शिंदे यांनी वसई मध्ये भरलेल्या स्वामींच्या चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी निमंत्रण दिले. चित्र प्रदर्शन पाहून झाल्यावर पुढे घोडबंदर येथे जाण्याचा बेत अचानक रद्द झाला आणी अचानक भुईगाव येथे जाण्याचे ठरले. स्वामी आपल्या भक्तांची इच्छा कशी पूर्ण करतात याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला.

The distance from Vasai station to Bhuigaon should be around 8 to 9 km. Swami Samarth Bhuigaon Math is established in the residential area a little inland from the main road. Good parking space is available in front of the temple. The architectural design of the temple is attractive and gives a sense of spiritual power. Food has been arranged by the Temple Committee.

वसई स्टेशन पासुन भुईगाव हे अंतर साधारण 7 ते 8 km असावे. मुख्य रस्त्यापासून थोडे आतल्या बाजूस रहिवाशी वस्तीच्या मध्ये स्वामी समर्थ भुईगाव हा मठ स्थापित आहे. मंदिराच्या समोर उत्तम पार्किंग साठी जागा उपलब्ध आहे. मंदिराची वास्तू रचना ही आकर्षक असून आध्यात्मिक शक्तिची अनुभूती करून देणारी आहे. मंदिराच्या बाहेर उत्तम पार्किंग chi सोय मंदिर समितीद्वारे करण्यात आली आहे. शेजारी अन्नछत्र ही अविरत चालू आहे.

In the hall of the main temple, the Datta sect and famous saints are seen in pictures everywhere. Adjacent to Audumbara is a handsome oil painting by Vitthal Rakhumai. After proceeding from there you can reach Swami’s Mutt. The structure of the monastery is small but it is very creative. Seeing Swami’s dematerialized idol in front of him, it seems as Swami has actually landed on the surface. After darshan there is a circumambulation path around the temple. Where many of Swami’s works are depicted. Adjacent is a book stall and office where you can get spiritual books and information about the various activities of the monastery.

मुख्य मंदिरातील सभागृहात सर्वत्र दत्त संप्रदाय आणी प्रसिद्ध संत यांची तसबिरीतून भेट होते. औदुंबराच्या शेजारीच विठ्ठल रखुमाई चे देखणे तैलचित्र आहे. तेथून पुढे गेल्यावर आपणास स्वामींच्या मठात जाता येत. मठाची रचना छोटेखानी असून ही फार कल्पकतेची आहे. समोर स्वामींची देह हरपुन टाकणारी मूर्ती पाहून, जणू साक्षात स्वामी भूतलावर अवतरल्या सारखे भासते. दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. जेथे स्वामींच्या अनेकलीला चित्रांकीत केल्या आहेत. शेजारी पुस्तकांचा स्टॉल आणी कार्यालय आहे जेथे आपणास आध्यात्मिक पुस्तके आणी माठातील विविध उपक्रमांची माहिती मिळू शकेल.

Tips and things to do in Swami Samarth Math Bhuigaon – स्वामी समर्थ मठ भुईगाव येथील उपक्रम

  • Food donation – अन्नदान
    • Every Thursday and Sunday
    • Donation for full day meal = 21,000,
  • Abhishek pooja, Satyanarayan Pooja, Veeda Prasad, rudrabhishek Such spiritual rituals are performed here – अशाप्रकारच्या आध्यात्मिक पूजाविधी येथे केल्या जातात.
  • Spiritual Journeys trip = मंदिराचे संस्थापक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट, दत्त संप्रदायातील अनेक ठिकाणे, पंढरपूर, अष्टविनायक, चारधाम अश्या अनेक सहली आयोजिण्यात येतात.
  • Swami Samarth Math Bhuigaon temple timings = Morning 7 am to 9 pm.
  • Festivals celebrated in the temple is Swami Manifest Day and Dutt Jayanti – मंदिरात साजरे होणारे उत्सव स्वामी प्रकट दिन आणि दत्त जयंती
  • For donations Bank Name :
    • AC Name SHREE SWAMI SAMARTH SEVA PARIVAR BHUIGAON, IDBI BANK, ICNo 2060102000001182 (Current Account) IFSC Code: 1BKL0002060
  • Swami Samarth Math Bhuigaon temple address = Swami Samarth Math, At post Bhuigaon, Taluka Vasai, District Palghar, Maharashtra State, India.
  • Contact details = Mr. Sandeep Mhatre = 9930607750

How to reach Swami Samarth Math Bhuigaon vasai travel guide

To reach Swami Samarth Math Bhuigaon first of all one has to come near Vasai station of Western Railway in Mumbai. Buses and autos are available for Bhuigaon from Vasai Paschim. You can reach Bhuikhaw by covering a distance of about seven to eight kilometers. Five hundred meters inland from the main road is Sri Swami Samarth’s monastery at Bhuigaon.

स्वामी समर्थ मठ भुईगाव येथे जाण्यासाठी सर्व प्रथम मुंबई येथील पश्चिम रेल्वेच्या वसई स्टेशन जवळ यावे लागेल. वसई पश्चिम येथून भुईगाव साठी बसेस तसेच ऑटो मिळू शकते. साधारण सात ते आठ किलोमीटर अंतर पार करून तुम्ही भुईखावला पोहोचू शकता. मुख्य रस्त्यापासून पाचशे मीटर आतल्या बाजूस श्री स्वामी समर्थ यांचा भुईगाव येथील मठ आहे.

Near-by please to visit or shree Swami samarth click on below link

Categories: HOLY PLACES, Shree Swami Samarth, Tourist places, UNKNOWN PLACESTags:

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: