Rare photographs of Shree Swami Samarth – श्री स्वामी समर्थ महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे


Hello everyone, today on the occasion of Gurupurnima. We are launching a section as Sri Swami Maharaj Akkalkot on our website http://www.varadprasadtours.com. In this section include information about Shree Swami maharaj, Datta Sampradaya, some rare photographs, Swami’s monastery, his followers, items handled by Swami, persons who benefited from Swami’s proximity, Swami’s family, we will share some experiences with you. Which will be useful for your spiritual progress.

श्री स्वामी समर्थ यांची समाधी म्हणजेच त्यांचे प्रिय भक्त चोळप्पा महाराज यांचे घर

नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आम्ही श्री स्वामी महाराज अक्कलकोट असे एक सदर http://www.varadprasadtours.com या आपल्या संकेतस्थळावर सुरू करीत आहे. या सदरात स्वामी, दत्त संप्रदाय, याबद्दलची माहिती सोबत, काही दुर्मिळ छायाचित्रे, स्वामींचे मठ, त्यांचे अनुयायी, स्वामिनी हाताळलेल्या वस्तू, स्वामी सान्निध्य लाभलेल्या व्यक्ति रूप विभूती, स्वामी परिवार, काही अनुभव आपल्या सोबत शेअर करणार आहोत. जे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोगी ठरेल.

Rare photographs of Sri Swami Samarth – श्री स्वामी समर्थ महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे

Original photograph of Shri Swami Samarth taken in 1875 Free copy for Swami Samarth devotees!

श्री स्वामी समर्थ यांचे अस्सल 1875 वर्षात काढलेले छायाचित्र स्वामी समर्थ भक्तांना मिळणार मोफत प्रत !

This photograph has reached us from some learned devotees. We wish to distribute this copy to Swami Bhakta Parivar free of charge and absolutely as a service to Swami only.

हे छायाचित्र काही अभ्यासू भक्तांकडून आमच्यापर्यंत पोहोचले आहे. केवळ स्वामी सेवा म्हणून ही प्रत आम्ही स्वामी भक्त परिवारापर्यंत निशुल्क आणी निरपेक्षपणे पोहोचवू इच्छितो.

The Kodak brand is well known. George Isman Kodak founded the company between 1850 and 1856. In the early days, the Kodak company produced some rare photographs. Photography was a great invention at that time. Photographs had to be taken using many chemicals. To introduce such a new invention to the public, a representative of the company came to India and started capturing the unique character. In this activity he came to Akkalkot.

स्वामी समर्थ मठ पळसदरी

कोडॅक ब्रँड हा सर्वश्रुत आहे. त्याचे जनक जॉर्ज इस्मन कोडॅक यांनी सन 1850 ते 56 दरम्यान कंपनी स्थापन केली. सुरवातीच्या काळात कोडॅक कंपनीने काही दुर्मिळ छायाचित्रे काढली आहे. त्यावेळी छायाचित्र हा एक मोठा आविष्कार होता. अनेक रसायन वापरून छायाचित्र काढावे लागायचे. अश्या नविन आविष्कार लोकाभिमुख करण्यासाठी कंपनी चा एक प्रतिनिधी भारतात येऊन त्यांनी अद्वितीय व्यक्तिरेखा टिपण्यास सुरवात केली. या उपक्रमात ते अक्कलकोट येथे आले.

Rare photo of Swami and Leela of Swami – स्वामींचा दुर्मिळ फोटो आणी स्वामींची लीला

After reaching Akkalkot, as usual, the photographer tried to took photograph Swami without his consent. But when this photograph was processed from the negative, Swami was not visible in the photograph. This was tried many times, finally Swami’s leela and divinity came to the notice of the photographer. Finally he surrendered at the feet of Swami. The miracle that happened at that time was that Swami’s presence was evident in all the photographs taken. A close look at this photograph reveals many bright symbols. We will discuss it in detail in the next section.

Advertisements
स्वामी समर्थ महाराज यांचे सर्वात जवळचे शिष्य ज्यांना स्वामी कृपेने गुरूपद प्राप्त झाले असे बाळप्पा महाराज आणी त्यांनी स्थापन केलेला स्वामी मठ जेथे स्वामी महाराजांच्या पादुका दर्शनास उपलब्ध आहेत.

अक्कलकोट ला पोहोचल्या नंतर नेहमीच्या सवई प्रमाणे फोटोग्राफर ने स्वामींच्या संमतीशिवाय स्वामींच् छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा हे छायाचित्र निगेटिव्ह पासून प्रोसेस करण्यात आले तेव्हा त्या छायाचित्रात स्वामी दिसत नव्हते. असा अनेकदा प्रयत्न झाला, शेवटी स्वामींची लीला आणी दैवत्व त्या फोटोग्राफर च्या लक्षात आले. शेवटी स्वामीच्या चरणी शरण आले. त्यावेळी झालेला चमत्कार म्हणजे पुढे काढलेल्या सर्व छायाचित्रात स्वामींचे अस्तित्व साक्षात दिसून आले. या छायाचित्रास निरखून पाहता अनेक तेजोमय बोधचिन्ह दिसून येतात. त्याची सविस्तर चर्चा आपण पुढील भागात करू.

One of our Swami devotees studying more about ShreeSwamiSamarth Maharaj. They found the following information. At that time the camera was like a box. 33 photographs of Swami were taken. The negatives of 22 of these photographs have been preserved by the company. This incident is from 1875. After that Swami had come to the Ahamadnagar . At that time, he was also photographed at the home of his disciple Vamborikar by Butwell Samson photographer from England. Swami Seva is the sole purpose behind this photograph and information. We do not claim any rights to these photographs. We intend to provide some of the photographs in absolute and free form to the Swami devotees among us.

श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी शोधलेले श्री दत्तात्रेयाचा वास असलेले ठिकाण कुरवपूर तेलंगणा

आपल्या पैकी एक स्वामी भक्त याचा अभ्यास करताना. त्यांनी खालील माहिती शोधून काढली. त्यावेळी कॅमेरा हा खोक्यासारखाच होता. स्वामींची 33 छायाचित्रे काढली गेली. यापैकी 22 छायाचित्रांच्या निगेटिव्ह कंपनीने जतन केल्या आहेत. ही घटना 1875 मधील आहे. त्यानंतर स्वामी नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांचे शिष्य वांबोरीकर यांच्या घरीही त्यांचे छायाचित्र इंग्लंडमधील बुथवेल सॅमसन छायाचित्रकाराने काढले. या छायाचित्र आणी माहिती मागे स्वामी सेवा हा एकमेव उद्देश आहे. या छायाचित्रांचे आम्ही कोणतीही अधिकार आपलेसे करू इच्छित नाही. निरपेक्ष आणी निशुल्क स्वरुपात काही छायाचित्रे आपल्यातील स्वामी भक्तांना पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.

Swami Samarth of Akkalkot has crores of devotees. Until now only pictures of Swami were available to Swami devotees. Now his original photograph is available. Interestingly, it dates back to the year 1875. To get a copy of Shri Swami Samarth Maharaj, please send your contact number and address in the comments below.

अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे कोट्यवधी भक्त आहेत. स्वामी भक्तांना आतापर्यंत स्वामींची फक्त चित्रे उपलब्ध होती. आता त्यांचे अस्सल छायाचित्र उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे, ते सन 1875 मधील आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रत मिळवण्यासाठी संपर्क खाली कमेन्ट मध्ये आपला contact number आणी पत्ता पाठवा.

Darshan and Abhishek Pooja of Sri Swami Samarth Maharaj’s Samadhi – श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधीचे दर्शन आणी अभिषेक पूजा

Categories: Shree Swami SamarthTags:

Leave a Reply

English हिन्दी मराठी
%d bloggers like this: